Mahajan left MNS : मला वापरून घेतलं, मी अमितजींचा अपराधी

Prakash Mahajans regrets leaving MNS : मनसेला सोडचिठ्ठी देत प्रकाश महाजनांची खंत

Mumbai : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, यावेळी त्यांनी मनातील खंत उघड केली आहे. एका व्हिडिओद्वारे त्यांनी आपल्याला विधानसभेच्या प्रचारापुरतेच वापरले गेले, असा आरोप केला. तसेच मी अमित ठाकरेंचा अपराधी आहे, असेही ते म्हणाले.

महाजन म्हणाले, “माझ्या अपेक्षा फारशा नव्हत्या. कोणतेही पद किंवा तिकीट हवे होते असे नाही. मी फक्त हिंदुत्वाच्या विचारासाठी काम करत होतो. मात्र, माझ्या वाट्याला उपेक्षा आली. मला फक्त प्रचाराला वापरून घेतले गेले. मी ठाकरेंना शब्द दिला होता की तुमच्या मुलासोबत काम करेन. पण आज मला अपराधी वाटत आहे.

Maharashtra politics : महापालिका नियुक्त्यांवरून नाराजी ची चर्चा !

त्यांनी सांगितले, असंख्य मानसैनिकांनी मला दिलेल्या प्रेमाचा मी ऋणी राहीन. पण या मनोरुग्ण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. कुठेतरी आपण थांबलं पाहिजे, हीच वेळ आहे.”

याआधीच त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. प्रकाश महाजन यांनी याआधीही मनसे-शिवसेना ठाकरे गटाच्या संभाव्य युतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. 24 जून 2025 रोजी त्यांनी, “युती झाली नाही तर मराठी माणूस राज व उद्धव ठाकरेंना कधीही माफ करणार नाही. त्यांची ही चूक मराठी माणसाला 100 वर्षे मागे नेईल आणि इतिहास काळ्या अक्षरात नोंद करेल,” असे विधान केले होते. यामुळे पक्षात त्यांना साईडलाईन केल्याची चर्चा होती.

15 जुलै 2025 रोजी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी पक्षात एकटे पडल्याची भावना मांडली होती. भाजप खासदार नारायण राणे यांच्याशी झालेल्या वादानंतर पक्षातील वरिष्ठांनी उघडपणे आपला पाठींबा घेतला नाही, अशीही त्यांची खंत होती. “मी नाराज नाही, पण खिन्न आणि दुःखी आहे,” असे तेव्हा त्यांनी म्हटले होते.

Pressure for contract : राजकारण्यांच्या जवळच्या कंत्राट देण्यासाठी दबाव, पण..

यानंतर अमित ठाकरे यांनी त्यांना बोलावून समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, महाजन शिवतीर्थावर आले असतानाही राज ठाकरे त्यांना भेटले नव्हते. आता अखेर त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला.