Sensational claim of senior leader Eknath Khadse : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा खळबळजनक दावा
Jalgaon: भाजपमधील माजी मंत्री आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्यात वाद चिघळले आहेत. काही दिवसांपासून दोघेही एकमेकांवर जोरदार आरोप करत आहेत.
गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे आणि प्रफुल्ल लोढाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत खडसेंवर टीका केली. या फोटोवर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केले आहेत.
खडसे म्हणाले, गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीसांचे पाय चाटतात. त्यांच्या मागे पुढे फिरतात. मी तसं कधी केलं नाही, म्हणूनच मला भाजप सोडावी लागली. त्यांनी स्पष्ट केलं की, “मी तुमच्यासारखं मुख्यमंत्र्यांच्या मागे फिरत नाही. कुठेही लोटांगण घालत नाही. ‘देवा भाऊ’चे पाय मी चाटत नाही. खडसे म्हणाले की, “गिरीश महाजन यांनी जो फोटो पोस्ट केला आहे, तो काहीच सांगणारा नाही. मीही अनेक फोटो पोस्ट करू शकतो की गुलाबी गोष्टी कोणासोबत केल्या. योग्य वेळ येऊ द्या, सगळं बाहेर येईल.
Gulabrao Patil : जबाबदारी झटकत गुलाबराव पाटलांनी जखमेवर मीठ चोळले !
तसेच खडसे यांनी सांगितले की, मी 40 वर्षे भाजपमध्ये काम केलं. रक्ताचं पाणी करून पक्ष वाढवला. पण गिरीश महाजन यांच्या वादामुळे मला पक्ष सोडावा लागला. गिरीश महाजन यांनी याआधी ट्वीट करत खडसेंवर टीका करत लिहिलं होतं की, एकनाथ खडसे… तुमच्या या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगल्या आहेत? हे जनतेसमोर उघड होतंय. तुम्ही ज्याला दारूडा म्हणत होता, त्याच प्रफुल्ल लोढासोबत तुम्ही आहात. त्याच्यावर तुमच्यावर खुनाचा आरोप आहे, हे विसरू नका.