Breaking

Mahametro Nagpur : मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना हवे केंद्रासारखे वेतन!

 

Metro employees want salary like central Government : ७०० कर्मचाऱ्यांनी काढला मोर्चा

Nagpur नागपुरातील बहुतांश बेरोजगारांचा मेट्रोमध्ये मध्ये नोकरी लागावी यासाठी प्रयत्न असतो. आमदार-खासदार, मंत्र्यांकडे मेट्रोत नोकरी लावून देण्यासाठी सातत्याने अर्ज येतात. एकीकडे मेट्रोमध्ये नोकरी मिळावी म्हणून लोक प्रयत्न करीत आहेत. आणि दुसरीकडे मेट्रोत नोकरी करणाऱ्यांनी सध्याच्या वेतनावर नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारप्रमाणे वेतन मिळावी, अशी मागणी केली आहे.

पूर्वी केंद्राप्रमाणे वेतन दिले जात होते. मात्र २०१९ पासून अचानक मेट्रोतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना पूर्वकल्पना न देता राज्य शासनाच्या दुकाने व आस्थापन कायद्यानुसार वेतन द्यायला सुरुवात झाली. याचा विरोध करण्यासाठी शुक्रवारी नागपूर मेट्रो रेल कंत्राटी कर्मचारी संघाने मेट्रो भवनावर मोर्चा काढला. मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

PWD Maharashtra : शेकडो झाडांची कत्तल केली कुणी?

 

मेट्रोत स्थायी स्वरूपात कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणेच वेतन दिले जाते. मात्र स्थानकावर काम करीत असलेल्या तिकिट विक्रेते, सुरक्षा रक्षक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या निकषानुसार वेतन दिले जाते. मेट्रोत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन देताना हा दुजाभाव का? असा सवाल उपस्थित करण्यात आला.

तसेच न्याय देण्याची मागणी या मोर्चातून आंदोलनकर्त्यांनी केली. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात नागपूर मेट्रो रेल कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या संरक्षिका शिवानी दाणी, भारतीय मजदूर संघाचे महामंत्री गजानन गटलेवार, अध्यक्ष महेश खांदारे, महामंत्री नितीन कुकडे, उपाध्यक्ष रोहित नारनवरे, सचिव आशिष समुद्रवार, शुभम वेलंकीवार, अभिषेक खुळे, संघटन सचिव प्रांजल चौधरी, सदस्य आकाश भिमटे, रिंकू वेखंडे, निलेश खोडे आदींचा सहभाग होता.

Chandrashekhar Bawankule : विधानपरिषदेसाठी बावनकुळेंना ‘चढवला’ मुकूट?

 

आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी महामेट्रोला वेळोवेळी निवेदन देण्यात आले. महामेट्रोकडून आश्वासनही देण्यात आले होते, मात्र चार वर्षांपासून आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे रजा मिळाव्यात, कंत्राटी पद्धतच रद्द झाली तर कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेल, ग्रॅज्युएटीचे लाभ मिळावे, महामेट्रोचा लागो असणारे ओळखपत्र मिळावे, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.