Breaking

Jaykumar Rawal : महाराष्ट्र आणि ब्राझीलच्या गोयास राज्यात अनेक बाबींमध्ये साम्य !

Maharashtra and the Brazilian state of Goias have many similarities : विकासाची नवी सुरूवात करण्यासाठी जयकुमार रावल यांचे ब्राझीलच्या शिष्टमंडळास आवाहन

Mumbai : महाराष्ट्र आणि ब्राझीलच्या गोयास राज्यात अनेक बाबींमध्ये साम्य आहे. महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांत देशात आघाडीवर आहे. महाराष्ट्राप्रमाणेच गोयासमध्येदेखील तंत्रज्ञान आणि नाविन्यतेवर भर दिला जातो. यामुळेच महाराष्ट्र आणि गोयास सोबत येऊन विकासाकडे वाटचालीची नवी सुरुवात करूया, असे आवाहन राजशिष्टाचार आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी गोयासच्या शिष्टमंडळास केले.

ब्राझीलच्या गोयास राज्याचे गव्हर्नर ई. रोनाल्डो रामोस काईडो यांच्या नेतृत्वातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या शिष्टमंडळाने राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी विविध विकासात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली.

Sudhir Mungantiwar : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे प्रथमच येणार चंद्रपुरात 

मंत्री रावल म्हणाले, भारत आणि त्यातही महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहे. यामुळे जग भारताकडे आश्वासकतेने पाहत आहेत. महाराष्ट्रात विविध उद्योगांबरोबरच कृषी क्षेत्राच्या विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. राज्यातील अनेक शेतकरी ऑरगॅनिक शेतीकडे वळत आहेत. ब्राझीलप्रमाणेच साखर उत्पादनामध्येदेखील महाराष्ट्र अग्रेसर आहे. राज्यात इथेनॉल तयार करण्यावर भर दिला जात आहे.

महाराष्ट्रातील आंबा, केळी, डाळिंब आदी फळे मोठ्या प्रमाणावर निर्यात होत आहेत. येथे प्रक्रिया उद्योगात गुंतवणुकीसाठीदेखील मोठा वाव आहे. महाराष्ट्र आणि गोयास राज्यामध्ये माहिती, तंत्रज्ञान, बाजारपेठ अशा विविध क्षेत्रांत आदान प्रदान होऊन द्विपक्षीय परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न करता येतील. यासाठी सामंजस्य करार करून परस्पर सहकार्याची क्षेत्रे निश्चित करू, असे रावल यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule : कारवाईसाठी मी स्वतः प्रयत्न करेन !

गोयास चे गव्हर्नर काईडो यांनी गोयास आणि महाराष्ट्रादरम्यान असलेल्या विविध क्षेत्रांतील साम्यावर भाष्य करून ऑरगॅनिक शेती ही काळाची गरज असल्याचे सांगितले. साखर उद्योग, इथेनॉल उत्पादन आदींसह विविध क्षेत्रांत सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यास त्यांनी सकारात्मकता दर्शविली.