Maharashtra Budget 2026 : अर्थसंकल्पाची ‘बॅग’ डॉ. संजय कुटेंच्या हातात; विधिमंडळात रंगला रंजक प्रसंग

cm-devendra-fadnavis-handed-over-budget-bag-to-mla-sanjay-kute : मुख्यमंत्र्यांनी क्षणभर दिली जबाबदारी; आमदारांच्या नजरा कुटेंकडे वळल्या

Buldhana राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याची परंपरा आहे. यंदाही हा सोहळा उत्साहात पार पडला; मात्र या वेळी त्या ठिकाणी घडलेला एक छोटासा पण रंजक प्रसंग राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला.

अर्थसंकल्पाची बॅग हातात घेऊन मुख्यमंत्री अभिवादनासाठी पुतळ्याजवळ पोहोचले. मात्र त्या वेळी तेथे आमदार व पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी झाल्याने उभे राहण्यासाठीही जागा उरली नव्हती. त्याच वेळी जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे एका कोपऱ्यात उभे असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले.

Sandip Shelke : जिल्हा समन्वयकपदाचा राजीनामा, आता जिल्हाध्यक्ष होणार?

क्षणभर थांबत मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाची बॅग कुटे यांच्या हातात दिली आणि स्वतः अभिवादनात सहभागी झाले. अचानक आपल्या हातात राज्याच्या अर्थसंकल्पाची बॅग आल्याने कुटेही क्षणभर चर्चेत आले. दरम्यान, त्या ठिकाणी उभ्या असलेल्या एका आमदाराने कुटेंना थोडे बाजूला सरकण्याचा इशारा केला; मात्र कुटेंनी हातातील अर्थसंकल्पाची बॅग दाखवतच “ही सुरक्षित ठेवायची आहे,” असा संकेत दिला. ते पाहताच सभोवतालच्या आमदारांनी त्यांना लगेचच थोडी मोकळी जागा

Sunetra Pawar : देऊळगाव राजाला १८ कोटींचा निधी द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन

कुटेंच्या हातात थेट अर्थसंकल्पाची बॅग पाहून अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. या क्षणाने वातावरणात हलकीशी उत्सुकता आणि हास्य निर्माण झाले. दरम्यान, हा प्रसंग पाहून काही जणांच्या मनात एक उपरोधिक विचारही उमटला की, ‘कदाचित कधीतरी हीच बॅग हातात घेऊन कुटेच अर्थसंकल्प सादर करतील का?’ विधिमंडळातील हा छोटासा प्रसंग सध्या राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.