Good ratings for underperforming accounts : बाळासाहेब थोरातांची टोलेबाजी, सामान्य प्रशासन विभागाबाबत मुख्यमंत्री खरच बोलले
Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाच्या मुल्यांकनाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यावरून विरोधकांनी सरकारची टिंगल सुरू केली आहे. अतिशय सुमार कामगिरी करणाऱ्या खात्यांना चांगले रेटिंग दिले गेल्याची खोचक टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. मंत्रिमंडळातील सध्याच्या वातावरणाचा परिणाम निकालावर दिसत असल्याचेही ते म्हणाले.
बाळासाहेब थोरात आज (२ मे) नागपुरात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सरकारच्या रिपोर्ट कार्डची क्रमवारी पाहिल्यावर सहजच लक्षात येते की या सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही. एसटीच्या बसेस खडखड वाजून रस्त्यांवर बंद पडत आहेत. रस्त्यांवर खड्डे की खड्ड्यांत रस्ते हेच जेथे कळत नाही, त्या विभागालाही चांगला नंबर मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच निकष लावले, हे मंत्र्यांनी ओळखून घेतले पाहिजे. सामान्य प्रशासन विभागाची कामगिरी खराब झाली, हे मात्र मुख्यमंत्री खरं बोलले.
Women and Child Development : फडणवीसानी उलटा क्रम लावला की काय ?
नितेश राणे यांचे महाराष्ट्रात महान कार्य सुरू आहे. दोन धर्मांत वाद कसा निर्माण करता येईल, हा एकमेव कार्यक्रम ते राबवत आहेत. त्यामुळे त्यांना पाचवा नंबर देण्यात आला आहे. आश्वासन देऊन मते घेता आणि निवडून आल्यावर त्याला निवडणुकीचा जुमला म्हणता, हे जनतेच्या लक्षात आलेले आहे. सोयाबीन, कापूस, फळबाग शेतमालांचे भाव पडले आहेत. आपली फसवणूक झाली, हे एव्हाना शेतकऱ्यांच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे शेतकरी सत्ताधाऱ्यांना माफ करणार नाहीत, असे थोरात म्हणाले.
Shivsens uddhav Balasaheb Thackrey : शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा
शरद पवार आणि अजित पवार यांच्या बाबतीत विचारले असता, हे दोन्ही नेते आमच्यापेक्षा कॅमेऱ्यापुढे जास्त येतात. त्यामुळे त्यांचं काय चाललंय, हे त्यांनाच विचारलं पाहिजे. मला त्याबाबतीत काहीही माहिती नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.