Breaking

Maharashtra Congress : काँग्रेसच्या यात्रा संपेना, आता आत्मसन्मान पदयात्रा काढणार

Congress to take out Atmasanman Yatra for farmers : शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर; यवतमाळमधून ३ जूनला होणार सुरुवात

Nagpur गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या राजकीय पक्षांच्या यात्रा अद्यापही संपलेल्या नाहीत. काँग्रेसने तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यापुढे आणखी एका यात्रेचे आयोजन केले आहे. काँग्रेसची ही यात्रा शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानासाठी असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

काँग्रेस प्रदेश समितीने ३ जून रोजी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील दाभडी येथील ओंकारेश्वर मंदिरातून ‘शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा’ काढण्याची घोषणा केली आहे. या पदयात्रेचे रूपांतर आर्णी बाजार समितीमध्ये शेतकरी मेळाव्यात होणार असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली आहे.

Maharashtra Cabinet : राज्याचे मंत्रिमंडळ अमित शाह यांची खुशामत करण्यात मग्न !

या पदयात्रेचे नेतृत्व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ करणार आहेत. खासदार प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर, माणिकराव ठाकरे यांच्यासह पक्षाचे आमदार, पदाधिकारी पदयात्रेत सहभागी होतील. विदर्भातील सर्व खासदारांनाही आमंत्रित करण्यात आल्याची माहिती शिवाजीराव मोघे यांनी दिली. २० मार्च २०१४ रोजी दाभडीमध्ये तत्कालीन पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’दरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधताना १९ आश्वासने दिली होती.

Maharashtra Cabinet : राज्याचे मंत्रिमंडळ अमित शाह यांची खुशामत करण्यात मग्न !

यानंतर मोदी पंतप्रधान झाले; परंतु यापैकी १८ आश्वासनांची पूर्तता अद्यापही केलेली नाही. केवळ नर्मदा नदीवर धरण बांधून विदर्भाला पाणी देण्यासाठी पुढाकार सुरू झाला आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज माफीबाबत फक्त चर्चाच आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केलेल्या नाहीत, कृषी उत्पादित माल विशेषत: कापूस आणि सोयाबीनला आश्वासनानुसार भाव मिळत नाही. बँकांनी पीक कर्जाचे व्याज दर कमी केलेले नाहीत. शेतकरी आत्महत्या मागील १० वर्षांत वाढल्या आहेत.

या सर्व गोष्टींच्या निषेधार्थ शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढली जाणार आहे. आपली फसवणूक व दिशाभूल झाल्याची जाणीव शेतकऱ्यांना झाली असल्याचे मोघे म्हणाले. परिषदेला गिरीश पांडव उपस्थित होते.