Breaking

Maharashtra Congress : निवडणुकीत कामचुकारपणा करणाऱ्या नेत्यांना ‘दे धक्का’ !

Congress will reorganize from the booth level: काँग्रेस करणार बूथस्तरापासून पुनर्रचना

Nagpur विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी काम न करण्यावर भर दिला होता. मात्र अशा पदाधिकाऱ्यांना आता फटका बसण्याची चिन्हे आहेत. शहर काँग्रेसची बूथस्तरापासून पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मान्य झाला तर शहरात अनेक प्रभागांमध्ये बदल दिसून येतील. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हे पाऊल उचलले आहे.

महापालिका निवडणुकीत प्रत्येक बूथवर लक्ष केंद्रित करता यावे. यासाठी शहर काँग्रेसची रचना बदलण्यात येणार आहे. सध्या १५ ते २० बूथमागे एक वॉर्ड अध्यक्ष आहे. आता १० बूथमागे एक वॉर्ड अध्यक्ष नियुक्त केला जाईल. या संबंधीचा प्रस्ताव शहर काँग्रेसकडून प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात आला आहे. नवे वॉर्ड अध्यक्ष नेमताना लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्याने केलेल्या कामाची दखल घेतली जाईल.

Nagpur Police : व्वा रे हिंमत..! तोतया पोलिसांनी ठाण्यासमोरच वृद्ध दाम्पत्याला लुटले !

यासोबत संबंधित १० बूथ वरील भागात त्या कार्यकर्त्याचा जनसंपर्क व इमेज कशी आहे, याचाही विचार केला जाणार आहे. संबंधित भागातील काँग्रेसचे जुने कार्यकर्ते व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी कुणाची वॉर्ड अध्यक्षासाठी शिफारस केली असेल, तरी संबंधिताने केलेले काम तपासूनच नियुक्ती दिली जाणार आहे.

नागपुरातील प्रत्येक प्रभागात चार वॉर्ड अध्यक्ष कार्यरत आहेत. मनपा निवडणूक लक्षात घेता शहर काँग्रेसने आपल्या बूथ स्तरावर सक्रीय कार्यकर्त्यांची फळी उभारण्याची तयारी चालविली आहे. प्रत्येक बूथवर लक्ष केंद्रीत करता यावे, तेथील जास्तीत जास्त मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधता यावा, यासाठी १० बूथमागे एक वॉर्ड अध्यक्ष नेमण्याचा प्रस्ताव शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी प्रदेश काँग्रेसकडे पाठविला आहे. यामुळे वॉर्ड अध्यक्षांची संख्या सध्याच्या तुलनेत दीडपट होईल. सध्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तीन ब्लॉक अध्यक्ष आहेत.

The Ministry of Ayush : सिगारेट ओढता का? दम लागतो का?

याचा विचार करता नागपूर शहरात १८ ब्लॉक अध्यक्ष कार्यरत आहेत. आता प्रत्येक विधानसभेतील ब्लाॅक अध्यक्षांची संख्या वाढवून चार करावी, असाही शहर काँग्रेसचा प्रस्ताव आहे. ब्लॉक अध्यक्षांची संख्या वाढल्यामुळे बूथ अध्यक्ष व प्रभाग अध्यक्षांकडून अधिक सक्षमपणे काम करवून घेता येईल.