Winter waterfowl census at 16 water bodies : चक्रवाक, पट्टकादंब आढळले मोठ्या प्रमाणात
Wardha महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाद्वारे वेटलँड्स इंटरनॅशनल या जागतिक संस्थेने दिलेल्या कार्यपद्धतीनुसार राज्यात सर्वत्र हिवाळी पाणपक्षी प्रगणना करण्यात आली. जिल्ह्यातही वनविभाग आणि बोर व्याघ्र प्रकल्पाद्वारे बहार नेचर फाउंडेशनच्या सहकार्याने प्रादेशिक व वन्यजीव क्षेत्रातील महत्त्वाच्या १६ पाणवठ्यांवर शास्त्रशुद्ध पद्धतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी जिल्हा उपवनसंरक्षक हरवीर सिंह, बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी, मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर, प्रगणना समन्वयक तथा सहायक वनसंरक्षक अमरजीत पवार, बहारचे माजी अध्यक्ष पक्षीतज्ज्ञ प्रा. किशोर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा, सेलू, आर्वी, कारंजा, समुद्रपूर तालुक्यांतील तलाव व अन्य पाणस्थळ अधिवासात ही प्रगणना करण्यात आली. यावेळी अनेक स्थलांतरित पक्ष्यांसह निवासी पक्ष्यांची त्यांचा अधिवास, खाद्य, भौगोलिक क्षेत्र, वातावरण, कालावधी आदी पूरक माहितीसह नोंद करण्यात आली.
Social Responsibility : मनोरुग्णांची सेवा करणाऱ्या संस्थेसाठी पुढे आले महिला मंडळ
हिवाळी पाणपक्षी प्रगणना उपक्रमात सहायक वनसंरक्षक दयानंद कोकरे, बोरचे सहायक वनसंरक्षक दत्तात्रय लोंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी अर्चना नौकरकर, प्रादेशिक वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे, ज्ञानेश्वर गजभे, रूपेश खेडकर, पक्षी अभ्यासक दर्शन दुधाने, पराग दांडगे, राहुल वकारे, जयंत सबाने, राजदीप राठोड, अतुल शर्मा, घनश्याम माहोरे, पवन दरणे, मनीष ठाकरे, प्रवीण कडू, सुभाष मुडे, देवर्षी बोबडे, पल्लवी बोदीले, अशोक भानसे, शंतनू बोरवार यांच्यासह वनक्षेत्रपाल, वनरक्षक व अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.
Pankaj Bhoyar : हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे प्रश्न निकाली काढणार
या प्रगणनेत चक्रवाक आणि पट्टकादंब हे दोन पक्षी सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून आले. याशिवाय कोणकाेणत्या पक्ष्याची नोंद करण्यात आली, हे ३१ जानेवारीला कळणार आहे.