Maharashtra Jeevan Pradhikaran : ग्रामपंचायतचा निष्काळजीपणा; ३० गावांची पाणीकोंडी!

Water supply to 30 villages stopped due to water bill arrears : पाणीपट्टीच्या थकबाकीमुळे पुरवठा बंद, ग्रामस्थांचे हाल

Khamgao महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने थकीत पाणीपट्टी देयकाच्या वसुलीसाठी संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील अनेक गावांचा पाणीपुरवठा बंद केला आहे. प्रारंभिक टप्प्यात १९ गावांचा पाणीपुरवठा थांबवण्यात आला होता, तर आता हा आकडा वाढून ३० गावांपर्यंत पोहोचला आहे.

ग्रामसेवकांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरणातून भूमिगत जलवाहिनीच्या माध्यमातून या गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, संबंधित ग्रामपंचायतींनी थकीत पाणीपट्टीची रक्कम भरली नसल्याने पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

Lonar Lake : लोणार विकास आराखड्यावर मुंबईत होणार चर्चा!

संग्रामपूर तालुक्यातील १२ गावांवर १ कोटी ४७ लाख ९६ हजार ९०७ रुपये थकीत आहेत. त्यामुळे सायखेड, वानखेड, एकलारा, काथरगाव, पिंप्री, बोडखा, भिलखेड, उकळी बु., आवार, उकळी, दुर्गादैत्य, वकाना या गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील १८ गावांवर ४ कोटी ६५ लाख रुपये थकीत असल्याने जामोद, सूलज, मडाखेड बु., वाडी बु. खुर्द, आसलगाव, सताली, गाडेगाव खुर्द, धानोरा, पळशी सुपो, खांडवी, अकोला खुर्द, काजेगाव, रसुलपूर, खेर्डा खुर्द, वडशिंगी, निंभोरा बु., बोराडा बु., पिंपळगाव काळे या गावांचा पाणीपुरवठा थांबवण्यात आला आहे.

संग्रामपूर तालुक्यातील ९ पैकी ६ गावांच्या ग्रामपंचायतींनी काही रक्कम भरल्यामुळे त्यांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. यात पळशी, झाशी, संग्रामपूर शहर, पातुर्डा बु., टुनकी आणि वरवट बकाल यांचा समावेश आहे.

Chandrashekhar Bawankule : नागपूर जिल्हा परिषदेला १४२ कोटींचा निधी

अकोला पाटबंधारे विभागाने ५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला पत्र पाठवून १५ फेब्रुवारीपर्यंत थकीत पाणीपट्टी भरण्याचे आदेश दिले आहेत. हनुमान सागर धरणाच्या जलाशयातून पाणीपुरवठ्यासाठी १ कोटी ८५ लाख ९४ हजार रुपये भरणे आवश्यक आहे. ही रक्कम न भरल्यास १५ फेब्रुवारीपासून संपूर्ण पाणीपुरवठा बंद केला जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.