Wrestlers from across the state will come to Deoli : २९ जानेवारीपासून महाराष्ट्र केसरीचे आयोजन
Wardha विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय आखाड्यासाठी गाजलेल्या देवळीत आता खरीखुरी कुस्ती स्पर्धा होणार आहे. येत्या २९ जानेवारीपासून २ फेब्रुवारीपर्यंत राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा होईल. तसेच महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठीही कुस्तीपटू लढणार आहेत. एवढेच नव्हे तर महिला वरिष्ठ महिला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा व महिला महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धेची निवड चाचणी होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी देवळीवासीयांनी प्रचारसभा, रॅलींचा गोंधळ अनुभवला. जवळपास दीड महिना रंगलेल्या या राजकीय आराखड्याचा निकाल लागला आणि सरकारही स्थापन झाले. पण आता देवळीवासीयांना खऱ्याखुऱ्या आखाड्यातील कुस्तीपटूंची दंगल अनुभवायला मिळणार आहे. जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वाडीया पार्क, अहिल्यानगर येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वरिष्ठ महिला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा व महिला महाराष्ट्र केसरी किताब लढत २४ ते २५ जानेवारीला होणार आहे.
या स्पर्धेत जिल्हा कुस्तीगीर संघाचा कुस्ती संघ पाठविण्यासाठी पुरुष व महिला कुस्ती निवड चाचणी होईल. १५ जानेवारीला विदर्भ केसरी माजी खासदार रामदास तडस इनडोअर स्टेडियम देवळी येथे महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत ही चाचणी होणार आहे. जिल्ह्यातील पुरुष व महिला पहेलवानांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कुस्तीगीर संघाच्यावतीने मदनसिंग चावरे यांनी केले आहे.
Sports authority of India : संचालक अचानक धडकले अन् तारांबळ उडाली!
जिल्ह्यातील संघाच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यातून निवडलेल्या संघाची गादी व माती, अशी वेगवेगळी प्रवेशिका पाठवायची आहे. गादी प्रकारात ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७, तर महाराष्ट्र केसरी गट ८६ ते १२५ किलो. माती प्रकारात ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ आणि महाराष्ट्र केसरी गट ८६ ते १२५ किलो गटात होईल.