BJP MLA Praveen Datke aggressive over Nagpur division School ID scam : म्हणाले, शिक्षण विभागातील सर्व भ्रष्ट अधिकारी बदलवून टाका
Mumbai : नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटाळा गेल्या काही महिन्यांपासून गाजतोय. काही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. काही अटकेत आहे, तर काही अटकपूर्व जामीनासाठी अजुनही धडपडत आहेत. हा प्रश्न भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी सभागृहात उपस्थित केला. या प्रश्नावरून ते आक्रमक झालेले बघायला मिळाले. शिक्षण विभागातील सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांना बदलवल्याशिवाय हा भ्रष्टाचार थांबणार नाही, असे त्यांनी सभागृहाला सांगितले.
आमदार दटके म्हणाले, सोमेश्वर नेताम हे निवृत्त शिक्षणाधिकारी होते. या अधिकाऱ्याच्या बोगस सह्या घेऊन सन २०१२ ते २०१९ या काळात शिक्षकांची बोगस भरती केली गेली. कोविडनंतर ती परमनंट दाखवली आणि त्या काळातील अरिअर्स काढून ते पैसे शालेय शिक्षण विभागातील अधिकारी आणि शाळांच्या संचालकांनी ते सरकारी पैसे वाटून घेतले. सरकारला चुना लावला. या प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करावे, असे निर्देश देण्यात आले होते.
Anjali Damania : त्यांनी मागितली आणि एका दिवसात मुख्यमंत्र्यांनी ‘ एसआयटी’ जाहीर केली?
दोषी लोकांवर कारवाई झाली आहे का? अशा बोगस पद्धतीने १५००, १२०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांची तपासणी केली जाणार आहे का? आजपर्यंत दिलेला पगार योग्य की अयोग्य, हे तपासून वसुली केली जाणार आहे का? ही शासनाने नेमलेली समिती आहे. या समितीचे अध्यक्ष तीन वेळा बदलले आणि त्या तिघांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांतील दोघांना अटक झाली. या समितीवर योग्य अधिकारी नेमले जाणार आहेत का, असे प्रश्न आमदार दटके यांनी सभागृहात उपस्थित केले.
हा घोटाळा एकट्या नागपूर विभागातच नाही, तर राज्यभरात झाला आहे. शालार्थ बनावट आयडीतून २७०० शिक्षक भरले गेले. त्याची तक्रारही झाली. दोषींवर आरोप निश्चित केले का? एसआयटी नेमली त्यामध्ये हा घोटाळा समजून घेणारे अधिकारी आहेत का? काही अधिकारी काढले गेले. योग्य एसआयटी गठीत करून योग्य माहिती समोर आणणार का? निवृत्त, विद्यमान अधिकारी फक्त नागपूर विभागातीलच नाही, तर राज्यातील इतरही विभागांतील शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी केली जाणार आहे का, असा प्रश्नांचा भडीमार आमदार दटके यांनी केला.
सध्या या पदावरील अधिकारी भीतीपोटी काम करायला धजावत नाहीये. उपसंचालक, माजी प्राथमिक अधिकारी सर्वच यात बरबटलेले आहेत. सगळ्यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. विद्यादान हे पवित्र कार्य आहे. पण सर्वात जास्त भ्रष्टाचार याच विभागात होतो. सर्व अधिकारी बदलल्याशिवाय हा भ्रष्टाचार थांबणार नाही, असेही प्रवीण दटके म्हणाले.
Raj Thackeray : ‘ माझा ट्रेलर मी लाँच केला, पिक्चर अभी बाकी है’
आमदार दटकेंच्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री दादाजी भुसे म्हणाले, बनावट शालार्थ लॉग इन आयडीचा वापर करून काही चुकीचे प्रकार झाले, ही वस्तुस्थिती आहे. एसआयटी स्थापन करून शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तपास केला जातो आहे. १९ लोकांवर फौजदारी कारवाई झाली आहे. शिक्षण विभागाच्या माध्यमातून संचालक योजना यांच्या माध्यमातून समिती स्थापन करण्यात आली आहे. जे जे दोषी समोर येतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.