Breaking

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : जबरदस्तीने लिंकिंग खते घ्यायला लावत होते, मुनगंटीवारांनी दिला दणका !

Coromandel Company was forcing farmers to buy linking fertilizers, Sudhir Mungantiwar gave a blow! : कोरोमंडल इंटरनॅशनल प्रा. लि. कंपनीविरोधात अखेर गुन्हा दाखल

Mumbai : चंद्रपूर जिल्ह्यात कोलोमंडल इंटरनॅशनल प्रा. लि. ही कंपनी शेतकऱ्यांवर जोर जबरदस्ती करून अनावश्यक लिंकिंगची खते घेण्यास बाध्य करत होती. शेतकऱ्यांनी राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली. त्यानंतर मुनगंटीवार यांनी हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात सभागृहात लाऊन धरला. इतकेच नव्हे तर शनिवारी (५ जुलै) कोरोमंडलच्या विरोधात बल्लारपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात मुनगंटीवार आज (७ जुलै) म्हणाले, गुन्हा तर दाखल झाला आहे. पण या कंपनीचे मालक रग्गड श्रीमंत आहेत. असा एफआयआर ते खिशात घेऊन फिरू शकतात. त्यामुळे अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम सात अन्वये त्यांना अटक केली पाहिजे. मुनगंटीवार यांनी या विषयात मोठा कायदेशीर लढा लढला, आताशा या लढ्याला यश येताना दिसते आहे. जेव्हा कंपनीच्या संचालकांना अटक होईल, तेव्हाच हा लढा यशस्वी झाला, असे म्हणता येईल.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : आम्ही तक्रार केली, पण त्यांच्यात एफआयआर खिशात ठेऊन फिरण्याची क्षमता !

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या तक्रारीत स्पष्ट करण्यात आले की, जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्ट सूचनांनंतरही कोरोमंडल कंपनी शेतकऱ्यांना डीएपी खरेदी करताना सल्फर, पीडीएम पोटॅश आणि १५:१५:१५ खते जबरदस्तीने घ्यायला लावत होते. परिणामी, शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत होते. याबाबत मुनगंटीवार यांनी कृषी सचिव विकास रस्तोगी यांची भेट घेऊन लक्ष वेधले होते, तसेच संबंधित कंपनीच्या विक्री व विपणन उपप्रबंधकाशीही संवाद साधून, चुकीचे व्यवहार थांबविण्याची स्पष्ट मागणी केली होती.

Sudhir Mungantiwar : घरकुल योजनेचे काम प्रभावी व समन्वयाने करा !

आ. मुनगंटीवार यांनी प्रशासनासमोर ही लूट थांबवण्याची जोरदार मागणी केली होती. ते म्हणाले, “शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा सुरूच राहणार असून, शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबले नाही तर आंदोलनात्मक मार्ग अवलंबला जाईल. यासंदर्भात जिल्हा कृषि अधिकारी यांनीही तक्रार दाखल केली होती,त्यावरून शेतकऱ्यांच्या लूट करणाऱ्या कंपनी विरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sudhir Mungantiwar : मराठीच्या मुद्यावर दूर दूरपर्यंत कुठलेही राजकारण नाही !

शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करणाऱ्या कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खत विक्रीच्या नावाखाली होणाऱ्या लुटीला आता प्रतिबंध लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे शेतकऱ्यांकडून आभार मानले जात आहे.