Aditya Thackeray, Sardesai aggressive against Minister Shambhuraj Desai : मंत्री शंभूराज देसाई यांच्याविरोधात आदित्य ठाकरे, सरदेसाई आक्रमक
Mumbai एकनाथ शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेत, देसाईंना घेरण्याचा प्रयत्न केला. यावरून विधानसभेत चांगलाच गोंधळ उडाला. मंत्र्यांच्या मदतीला शिंदे गटाचे दुसरे मंत्री गुलाबराव पाटील धावून आले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्या जोरदार हल्लाबोल झाला. मंत्री देसाई यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात आधीच्या सरकारचा उल्लेख केला आणि भडका उडाला.
मुंबई वांद्रे परिसरातील 42 एकर जमिनीवर संरक्षण विभागाची मालकी आहे त्यामुळे 9,483 झोपड्यांचे पुनर्वसन रखडल आहे. ही लक्षवेधी वरुण सरदेसाई यांनी मांडली. यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी 2019 ते 2022 साली तत्कालीन सरकारने याबाबत एकदाही बैठक घेतली नसल्याचं सांगितलं. यावरुन वरुण सरदेसाई यांच्यासह आदित्य ठाकरे आक्रमक झाले. तेव्हा तुम्हाला उत्तर ऐकायचं नाहीय का? असं म्हणत शंभूराज देसाई रागाने खाली बसले. यानंतर मंत्री गुलाबराव पाटील देखील शंभूराज देसाईंच्या मदतीला धावले. छातीवर हात मारत लाज काढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? तुम्ही जन्मताच शिकले का? असा सवाल उपस्थित केला.
Local Body Elections : अमरावतीत भाजप-स्वाभिमानी पक्षाचं ठरेना!
तुम्ही 2019 ते 2022 पर्यंत काय केले? याबाबत सांगा. एकदाही पत्र दिले नाही. एकदाही पाठपुरावा केला नाही. त्यावेळी कोणाचे सरकार होते? 2022 साली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिली. तुम्ही काय केले? आमची लाज काढू नका. तुम्ही काय केले ते सांगा? असे म्हणत देसाई यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. मी 2019 ते 2022 यावेळेत पाठपुरावा झाला नाही, हे मी म्हटलो. जर मी कोणाचं नाव घेतलं नाही तर मग एवढी मिरची लागायचं कारण काय? असा सवालही शंभूराज देसाईंनी उपस्थित केला.
Monsoon session : ऐतिहासिक विश्रामगृह पाडल्याचा वाद विधीमंडळात
विधानसभा सभागृहच्या बाहेर येत वरुण सरदेसाईंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी वांद्रे मधील 42 एकर डिफेनच्या जमिनीचा प्रश्न मी विचारला आणि गृहनिर्माण विभागाकडून हे उत्तर अपेक्षित होतं. अर्धा तास लक्षवेधी झाली. मात्र उत्तर मिळालं नाही किंवा तो प्रश्न सोडवला नाही. आम्ही आमच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवायला विधानसभेत येतो,जिथे जनतेचे प्रश्न सोडवले जातील. पण इथे 2019 ला काय झालं 2022 ला काय झालं हे सुरू आहे. हे धंदे आता बंद करा, जनतेचे प्रश्न सोडवा, असं सरदेसाईंनी सांगितलं.