BJP leader MLA Sudhir Mungantiwar will file a complaint against ‘Coromandel’ : शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही
Mumbai : शेतीसाठी रासायनिक खते नामांकित कंपनीकडून वितरित करण्यात येतात. यामध्ये रासायनिक घते कोरोमंडल इंटरनॅशन लिमिटेड या कंपनीकडून पुरवले जातात. पण खतांच्या वितरणासोबत अन्य वस्तू लिंकिंग करून जबरदस्तीने विकल्या जातात. शेतकऱ्यांना याचा थेट फटका बसतो. शेतकऱ्यांना नाईलाजाने अनावश्यक उत्पादने घ्यावी लागतात. हे शेतकऱ्यांचे शोषण आहे. यापुढे शेतकऱ्यांची लूट कदापि होऊ देणार नाही, असा पवित्रा राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला.
शेतकऱ्यांची लूट थांबवणारच असा निर्धार करून आमदार मुनगंटीवार उद्या (५ जुलै) दुपारी ३.३० वाजता चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करणार आहेत. शेतकऱ्यांना रासायनिक खत पुरवठा करताना जबरदस्तीने इतर वस्तू विकत घेम्यास भाग पाडणाऱ्या पुरवठाधारकाच्या विरोधात आता कायदेशीर लढा उभारला जाणार आहे. शेतकऱ्यांना अनावश्यक उत्पादने खरेदी करूनच खत मिळवावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आथिक शोषण होते.
‘लिंकींग’च्या प्रकारामुळे होणार शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या लुट प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या हितांमध्ये कुठलाही अन्याय सहन करणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी उद्या तक्रार देऊन आमदार मुनगंटीवार करणार आहेत.