BJP leader MLA Sudhir Mungantiwar’s historic record in the legislature : जनतेच्या प्रश्नांवर तीच तळमळ आणि संवेदनशिलता
Mumbai : महाराष्ट्र विधिमंडळाच्या कार्यपद्धतीत आजच्या दिवशी महत्वाचा टप्पा गाठला गेला, याचे मला विशेष समाधान आहे, असे म्हणत राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तब्बल ३० अशासकीय विधेयक सभागृहात मांडले. या अशासकीय विधेयकांच्या माध्यमातून जनतेच्या न्याय्य हक्कांचा आवाज बुलंद होईल. ही अशासकीय विधेयके म्हणजे केवळ आकड्यांची मांडणी नाही, तर सामान्य जनतेच्या वास्तविक गरजांवर आधारीत आहेत, असेही आमदार मुनगंटीवार म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांनी ‘स्पिरीट ऑफ लॉ’ आणि ‘स्पिरीट ऑफ लेटर’या तत्वांची आठवण करून देत विधेयक पुनर्स्थापनेला परवानगी दिल्याबद्दल आमदार मुनगंटीवार यांनी त्यांचे आभार मानले. ते म्हणाले, हे विधान भवन लक्षनेधी भवन बनत चालले आहे, असे मी मागे गमतीने म्हणालो होतो. पण आज अध्यक्षांनी अशासकीय विधेयकांसाठी वेळ दिला, ही लोकशाहीसाठी आश्वासक बाब आहे. यामुळे लोकशाहीचा आवाज अधिक बुलंद होईल.
Eknath Shinde : अमित शाहांसमोर एकनाथ शिंदे म्हणाले जय गुजरात !
राज्य विधीमंडळाच्या इतिहासात आणि लोकशाही मूल्यांच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस (४ जुलै) एक मैलाचा दगड ठरला आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एकाच दिवशी तब्बल ३० अशासकीय विधेयकांची पुनर्स्थापना करून महाराष्ट्राच्या संसदीय इतिहासात अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित केला. ही केवळ एक रेकॉर्डब्रेक कामगिरी नाही, तर जनतेच्या प्रश्नांशी असलेली त्यांची असामान्य तळमळ आणि संवेदनशीलता यांचे प्रतीक आहे.
आमदार मुनगंटीवार यांनी सादर केलेली विधेयके शेतकरी, विद्यार्थी, महिला, ग्रामविकास, पर्यावरण आणि लोकहिताशी संबंधित आहेत. त्यामध्ये सामाजिक समतोल आणि प्रगतीचा स्पष्ट दृष्टीकोण दिसून येतो. जनतेचे प्रश्न हाच आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू असावा, ही भूमिका सातत्याने निभावणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे हे कृतीशील नेतृत्व विधिमंडळाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.