BJP leader Sudhir Mungantiwar increased the paddy procurement target for Chandrapur district : जास्तीत जास्त शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीत धान विक्री करता येणार
Mumbai : चंद्रपूर जिल्ह्यात यापूर्वी धान खरेदीचे उद्दीष्ट फार कमी होते. यासंदर्भात अनेक शेतकऱ्यांनी राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशील असलेले सुधीर मुनगंटीवार यांनी ९० हजार ६८० क्विंटल हे धान खरेदीचे उद्दिष्ट चंद्रपूर जिल्ह्यासाठी फार कमी असल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले आणि त्यात वाढ करण्याची मागणी केली. यासाठी त्यांना सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि सरकारने किमान आधारभूर किंमत खरेदी योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यासाठी हे उद्दिष्ट वाढवून एक लाख ९० हजार ६८० क्विंटर इतके निश्चित करण्यात केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी आमदार मुनगंटीवार यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी खरेदी फेडरेशनकडे पत्रव्यवहार केला होता. Beam पोर्टलवरील शेतकरी नोंदणी, जिल्ह्यातील गरज आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान याचा तपशीलवार सविस्तर आढावा घेऊन पत्राद्वारे त्याची माहिती देण्यात आली होती. या मागणीवर शासनाने सकारात्मक निर्णय घेतला असून चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता वाढीव उद्दिष्टाचा थेट लाभ होणार आहे.
Action against illegal moneylending : १५१ एकरांहून अधिक शेतजमीन, मालमत्ता परत
शासनाने केलेली ही उद्दिष्टवाढ केवळ प्रशासकीय प्रक्रिया नाही, तर आमदार मुनगंटीवार यांच्या शेतकरीहिताच्या संघर्षाचे ठोस फलित आहे. यामुळे आता अधिकाधिक शेतकऱ्यांना किमान आधारभूत दराने आपले धान विक्री करता येणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा मोठा आर्थिक आधार ठरणार आहे. आमदार मुनगंटीवार यांचा पाठपुरावा आणि शासन दरबारी केलेली प्रभावी मांडणी यामुळेच हजारो शेतकऱ्यांना हा दिलासा मिळाला आहे.