Breaking

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : मुनगंटीवार म्हणाले, धानाचा बोनस मिळणार की नाही, शेतकऱ्यांना शंका !

BJP leader Sudhir Mungantiwar said will Government give bonus to paddy farmers or not : कृषी मुल्य आयोगाला पैसै द्यायला हरकत नाही, पण शेतकऱ्यांनाही पैसे द्यावे लागतील

Mumbai : धान उत्पादक शेतकरी विविध नैसर्गिक संकटांचा सामना करून पिक घेतात. बऱ्याचदा त्यांना नुकसान सोसावे लागते. तरीही न डगमगता ते धान्य पिकवत राहतात. त्यामुळे आपण अन्न खातो. सरकारने शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. आपण धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याचे कबूल केले होते. पण अद्यापही त्यांच्या खात्यात बोनसचे पैसे जमा झालेले नाहीत, याकडे राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

यासंदर्भात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सरकारने कृषी मुल्य आयोगाच्या मानधनासाठी ६ कोटी ४१ लाख ५२ हजार रुपयांची तरतूद केली. आयोगाला पैसे द्या, त्याला कुणाचीही हरकत नाही. पण राज्य सरकारचे आकडे योग्य पद्धतीने गेले पाहिजे. जर शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे आकडे योग्य पद्धतीने गेले नाही. तर त्यांचे नुकसान होते. मग नुकसान भरपाईही मिळत नाही. कारण भरपाई देण्याची यंत्रणा अद्यापही तेवढी सक्षम झालेली नाही.

Jagdish Gupta : ठाकरे गटाला धक्का माजी मंत्री जगदीश गुप्ता शिवसेनेत !

गेल्या ३० तारखेपर्यंत ज्वारी खरेदीची मुदत होती, पण खरेदी पूर्ण झाली नाही. धान खरेदीच्या संदर्भात उत्पादकांनी मागणी केली की लक्षांक वाढवून द्या. पण तोही वाढवला जात नाही. सरासरी एकरी उत्पादन काढताना आणि आकडे पाठवाताना हेक्टरी कमी पाठवले जातात. कृषी अधिकाऱ्यांची चूक हजारो शेतकऱ्यांना भोगावी लागते. लक्षांक पाठवायचा असतो तेव्हा दर हेक्टरी धान, ज्वारी आणि सर्वच उत्पादनाची माहिती दिली पाहिजे. पण असे होत नाही, याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.

Harshvardhan Sapkal : पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा फतवा रेशिमबागेतून !

धानाच्या बोनसच्या संदर्भात हेक्टरी २० हजार रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला. यामध्ये १८०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जायला पाहिजे होते. पण अद्याप ते पैसे जमा झालेले नाहीत. समजा शेतकऱ्यांनी पोर्टलवर जाऊन नोंदणी केली आणि त्यानंतर धान विक्रीसाठी दिलाही नसेल, तरीही बोनस देण्याचा निर्णय केला आहे. यावर सरकारकडून उत्तर अपेक्षित आहे. कारण फक्त ९०० कोटी आवंटित झाले आहे. त्यामुळे बोनस मिळणार की नाही, ही शंका शेतकऱ्यांना आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.