BJP MLA Praveen Datke is aggressive on the Crime Control Amendment Bill : बंदरांमध्ये, महामार्गांवर सर्रास होतोय ड्रग्जचा वापर
Mumbai : सन २०२२ मध्ये १२ हजार ७०६ तरून गुन्हेगार, २०२४ ला पाच हजार ५७३६ आणि २०२५ ला १५ हजार ५६१ गुन्ह्यांची महाराष्ट्रात नोंद झाली. तरुण मुले मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाच्या सेवनाला बळी पडत आहेत आणि राज्यात ही संख्या वाढत चालली आहे. हे कुठवर चालायचं, असा प्रश्न करत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी सुधारणा विधेयकावर बोलताना प्रवीण दटके सभागृहात अचानक आक्रमक झाले. या बिघडत्या परिस्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली.
प्रवीण दटके म्हणाले, या सुधारणा विधेयकाची असणारी आवश्यकता नाकारून चालणार नाही. अंमली पदार्थ, द्रव्यांची वाढती लागवड, उत्पादन व निर्मिती यांमुळे समाजाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. राज्याच्या बंदरांंमध्ये, महामार्गांवर आणि बेकायदेशीर प्रयोगशाळांमधून तसेच औषधी निर्मिती कारखान्यांमधून ड्रग्जचा वापर सर्रास होत आहे. नागपुरात काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला. त्यासाठी नागपूर पोलिसांचे कोतुक केले पाहिजे.
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट यांची संपत्ती पाच वर्षात 13 पटींनी वाढली
अंमली पदार्थांसोबतच आजची तरूणाई सट्टेबाजारीमुळे बरबाद होत आहे. आयपीएल क्रिकेटचा सट्टा मोठ्या शहरांतील किंग चालवत आहेत. त्यामुळे पैशांच्या गरजेपोटी लहान मुलांमध्ये चोऱ्या करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. परिणामी आत्महत्यांसारखे प्रकार वाढत आहेत. प्लॉट विक्रीच्या व्यवसायात सामान्य नागरिकांना फसवून पैसे घेऊन १०-२० वर्षांपर्यंत प्लॉट दिले जात नाहीत. संघटिक गुन्हेगारीच्या माध्यमातून होणाऱ्या या प्रकाराकडे दटके यांनी लक्ष वेधले.
Hindi Marathi Conspiracy : ‘त्या’ राड्यानंतर राज ठाकरे मिरा भाईंदरला जाणार !
नोकरी देण्याचे आमीष दाखवूनही लाखो रुपये घेऊन तरुणांना फसवणारी मोठी साखळी तयार झाली आहे. त्यावरही अंकुश लावणे गरजेचे आहे. त्यासाठी सुधारणा विधेयकात तरतूद करावी, अशी मागणी दटके यांनी केली. अंमली पदार्थ विकणारे व त्याचे सेवन करणारे मोठ्या प्रमाणात सुशिक्षित आणि पांढरपेशे आहेत. यामध्ये महिला आणि लहान मुले अडकत आहेत. त्यामुळे राज्यात अमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन केले आहेत. परंतु ते अधिक कार्यक्षम करण्याची गरज प्रवीण दटके यांनी प्रतिपादित केली.
Shiv Sena-BJP : खुल्या भूखंडावरील अनधिकृत मंगल कार्यालय कुणाचे?
पोलिस स्टेशनमध्ये डीबी स्कॉडच्या बदल्या का केल्या जात नाहीत, असा सवाल दटके यांनी केला. डीबी स्कॉडने ठरवलं तर २४ तासांत शहरातील सर्व अवैध धंदे बंद होऊ शकतात. कायदा कडक बनवला तरी त्यावर अमल करणारे अधिकारी जोपर्यंत पारदर्शी कारभार करणार नाहीत, तोपर्यंत त्याचा उपयोग होणार नाही. गो तस्करी करणे तसेच दंगलीमधील आरोपींची नावे कमी करण्यासाठी पैसे घेऊन काम करणारे पोलिस कर्मचारी आजही आहेत, असा संशय दटके यांनी व्यक्त केला. पोलिस प्रशासन अधिक पारदर्शी करण्यासाठी आणि अमली पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी नार्को कोऑर्डीनेशन यंत्रणेची पुनर्रचना करून उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्याची मागणीही प्रवीण दटके यांनी सभागृहात लाऊन धरली.