Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांना ‘मकोका’ लागणार !

Chief Minister Devendra Fadnavis big announcement : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Mumbai : राज्यातील ड्रग्स तस्करीबाबत विधानपरिषदेत आज चर्चा झाली. यावेळी विधान परिषद सदस्यांनी ड्रग्स तस्करी रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्स तस्करी रोखण्यासाठी ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांना मकोका लावला जाईल अशी, मोठी घोषणा केली आहे.

राज्यातील ड्रग्सच्या तस्करीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यात ड्रग्सची तस्करी खपवून घेतली जाणार नाही. या प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, अशी घोषणाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. राज्यातील ड्रग्सची पाळंमुळं खोदून काढण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललण्याने तस्करांचे धाबे चांगलेच दणाणार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Hindi-Marathi Conspiracy : फडणवीसांनी हाणला ‘बॉम्बे स्कॉटीश’वरून आदित्या ठाकरेंना टोला, मग जे घडलं ते…

विधान परिषदेत राज्यातील एमडी ड्रग्सच्या तस्करीवरून चर्चा झाली. चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. एमडी ड्रग्स आणि इतर अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे. ड्रग्ज कारवायांमध्ये प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र युनिट कार्यान्वित करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या कारवाया करण्यात येत आहे. मोठ्या केसेससाठी केंद्राकडे फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी करण्यात आली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली.

Devendra Fadnavis-Sanjay Raut clash : मुंबईवरून फडणवीस-राऊतांमध्ये जुंपली, काढला एकमेकांचा बाप !

राज्यात मेफेड्रोनची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कारवाई करण्याची गरज आहे. ड्रग्सचा विळखा पडत आहे. आपली संख्या त्यात सर्वाधिक आहे. तस्करीचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे या सर्वांवर मकोका लावून कारवाई करणार का? ड्रग्स तस्करी करणाऱ्यांना लगेच जामीन मिळतो. त्यामुळे या केसेस फास्टट्रॅक कोर्टात घेणार का? असा सवाल आ. परिणय फुके यांनी केला होता. राज्यात ठिकठिकाणी ड्रग आणि अमली पदार्थांची तस्करी होताना दिसत आहे. यावर शासनाने योग्य पावले उचलली पाहिजेत. ड्रग्सची तस्करी रोखण्यसााठी टास्क फोर्स केले होते. त्याच काय झालं? असा सवालही उपस्थित केला होता.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : पोलिसांचे सर्वाधिक मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्याने !

त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, ड्रग तस्करी संदर्भात मकोका लावत येईल का? यावर या अधिवेशनात नियमावली आणत आहोत. कायद्यात बदल करून ड्रग तस्करी करणाऱ्यावर मकोका लावण्या संदर्भात कायद्यात सुधारणा करणार आहोत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

crime news : शिक्षिकेचा प्रताप! अल्पवयीन विद्यार्थ्याला फाइव स्टार हॉटेलमध्ये नेऊन करायची अत्याचार

शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी यावर सवाल केला. इतर राज्यातून अंमली पदार्थांची तस्करी होतेय. मध्यप्रदेश, गुजरातमधून जळगाव मुक्ताई नगर येथे आणि मध्य प्रदेशच्या आणि गुजरातच्या बॉर्डरवर अफू आणि गांजाची तस्करी होते, याकडे खडसे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आणि बॉर्डवर काही राज्यात भांगला परवानगी आहे. आपल्याकडे अफूला कुठेच परवानगी नाही. मुक्ताईनगर आणि इतर ठिकाणी असे प्रकार होत असतील तर कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

_____