Chief Minister Devendra Fadnavis’s sharp rebuke to Congress leader Nana Patole’s question : मुख्यमंत्री उत्तरे देण्यात एक्सपर्ट, म्हणून त्याच भूमिकेत रहावे का ?
Mumbai : महाराष्ट्रात गुन्हेगारी सातत्याने वाढत आहे. नकली कंपन्या स्थापन करून लोकांना लुटण्याचे काम सुरू आहे. यावर आम्ही कायदा करतोय, अशी आश्वासने मिळतात. पण प्रत्यक्षात होत काहीच नाही. चीट फंड कंपन्यांना ब्रेक लागणार की नाही, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी सभागृहात केला. सिस्का एलईडीसारख्या अनेक कंपन्या आहेत. तुमच्या मतदारसंघात आहेत, असेही पटोले यांनी अध्यक्षांना सुनावले. मुख्यमंत्री काय करताहेत? तुम्ही काय करत आहात, असा सवाल त्यांनी केला. त्यावर ‘नाना भाऊ काल दिल्लीला होते, त्यामुळे त्यांचा अभ्यास झालेला नाही’, असो टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना लगावला.
नाना भाऊ काल दिल्लीला होते, त्यामुळे त्यांचा अभ्यास झालेला नाही, असे म्हणत एकाने दुसऱ्याला फसवल्याची ती तक्रार आहे. कारवाई केलीच आहे. पण त्यांनी पैसै परत देण्याचे कबुल केले आहे. तथापि एफआयआर नोंदवला की आपण कारवाई पूर्ण करतो. पण पेपरमध्ये बातमी येते, त्यावर प्रश्न तयार होतात. या प्रकरणातही तसेच झाले आहे. सिस्काचा काही संबंध नाही. एकाने कंपनीचा माजी संचालक आहो, असे सांगून केलेले हे कांड आहे. जे लागूच नाही, त्याला लागू कसे करायचे, ते नाना भाऊंनी सांगावे, असे म्हणत स्पेसीफीक कंपन्यांच्या संदर्भातील माहिती नाना भाऊंना दिली जाईल, असे देवेंद्र फडणवीस नाना पटोलेंच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाले.
Anil Bonde : आपलं पाप झाकण्यासाठी उद्धव ठाकरेंचा हा प्रयत्न होता !
फडणवीसांच्या उत्तरावर नाना पटोले म्हणाले, मुख्यमंत्री उत्तर देण्यात एक्सपर्ट आहेत. पण ज्या कंपनीत पोलिसांनी पैसे गुंतवले, त्यांनाही लुबाडण्यात आले. त्यांचा आपसातील वाद जरी होता. पण ‘लागू नाही’ असे उत्तर मुख्यमंत्री का देत आहेत, असा प्रश्न पटोले यांनी केला. त्यावर ‘मुख्यमंत्री एक्सपर्ट आहेत म्हणून त्यांनी उत्तर देण्याच्याच भूमिकेत रहावं का’, असा प्रश्न अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोलेंना केला.
लुटालुटीचे काम दर महिन्याला कुठेतरी होत असते. त्वरीत कारवाई करण्याचे RBI चे आदेश आहेत. यामध्ये गरीब लोकांची करोडो रुपयांनी लूट होते. तरीही कारवाई का होत नाही, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यावर पोलिसांनी व्यापक मोहिम हातात घेतली आहे. अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू नये, यासाठी जनजागृतीची मोहीमही हाती घेतली आहे. कंपनी सुरू झाली, हे कळायला पोलिसांना मार्ग नाही. कारण रजिस्ट्रेशन करताना पोलिसांची परवानगी लागत नाही. व्यापक जनजागृती हाच एक उपाय आहे. कंपन्या रजिस्टर्ड नसतात. पैसे घेतात दोन तीन महिने व्याज देतात. मग गायब होतात. अधिकचा व्याज दर देण्याची हमी कुणी देत असेल तर जनतेने विश्वास ठेऊ नये. यासाठी लोकांनीच जागरुक राहिले पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.