Nilesh Rane angry over Aditya Thackerays Chaddi Banian Gang criticism : आदित्य ठाकरेंच्या ‘ चड्डी बनियन गँग’ टीकेवर निलेश राणे भडकले
Mumbai : विधानसभेत आज आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण धारावी महापालिका, नगरपालिका निवडणुका अशा विविध विषयावर सविस्तर मत मांडले आणि सरकारकडून काही मागणीही केल्या. आपल्या आवेश पूर्ण भाषणात आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाचा उल्लेख ‘ चड्डी बनियान गॅंग’ असा केला. हे भाषण संपल्यानंतर लगेच निलेश राणे उभे राहिले आणि त्यांनी आदित्य ठाकरेंवर आक्रमक शैलीत हल्लाबोल केला. एक एक तासापासून यांचा ऐकत आहे. असले शब्द तुम्ही कोणासाठी वापरतात हिम्मत असेल तर नाव घ्या. सभागृहात असले शब्द चालणार नाहीत असे त्यांनी सुनावले.
पावसाळी अधिवेशनाचा आठवड्याचा पहिलाच दिवस वादळी ठरल्या. यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरले ते आदित्य ठाकरे आणि निलेश राणे यांच्यातील वाद. राज्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवर बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पण चिमटा काढला. आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना युतीधर्म पाळणे गरजेचं असल्याने त्यांना काही गोष्टी सहन कराव्या लागतात. ज्या लोकांसोबत ते बसलेत ती ‘चड्डा बनियन गँग’ ते कुणालाही मारतात, काहीही करतात. पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. अशी टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना केली.
मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक याच्यासाठी करतो की त्यांनी मोठी सहनशिलता दाखवली. ते कुणावरही कारवाई करत नाहीत. मात्र सध्या राज्यात जे सुरू आहे, मुंबईत जे सुरू आहे त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. चड्डी बनियन गँगवर कडक कारवाई करावी आणि शासन काय असते ते दाखवून द्यावं असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं.
आदित्य ठाकरेंच्या या टीकेनंतर शिंदे गटाचे निलेश राणे चांगलेच भडकले. ते म्हणाले की, त्यांनी हे जे काही शब्द वापरले, त्यांनी नेमकी कुणावर कारवाई व्हावी हे सांगावं. नेमकं चड्डी कोण आणि बनियन कोण हे त्यांनी सांगावं. जर नाव घ्यायला भीती वाटत असेल तर सभागृहात असे शब्द वापरू नयेत. जर हिंमत असेल तर ते शब्द कुणासाठी होते हे सांगावं. उगाच टीका करायची म्हणून काहीही बोललं जातं असं हे राणी मी आपल्या आक्रमक शैलीत सांगितले आणि सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.
_____