Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party leader Ambadas Danve raised voice on the issue of police : पोलिसांच्या मुलभूत प्रश्नांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष
Mumbai : उन्ह – वारा – पाऊस – थंडी याची तमा न बाळगता समाजाचे स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी झटतो तो पोलीस. पोलिस हा समाजातील महत्वाचा घटक आहे. पण पोलीस कर्मचाऱ्यांना आजही निवासस्थान, आरोग्य व्यवस्था, डीजी लोन आदी प्रश्न भेडसावत आहेत आणि सरकारचे पोलिसांच्या या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होते आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज (२ जुलै) पोलिसांच्या या प्रश्नांना वाचा फोडली.
सभागृहात अंबादास दानवे म्हणाले, पोलिसांच्या मुलभूत सुविधांकडे राज्य सरकार लक्ष देत नाही. पोलिसांच्या शासकीय निवासस्थानांची पार दुरवस्था झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांना डीजी लोन मिळत नाहीये. आगामी काळात राज्य सरकार या सर्व विषयांवर धोरण आखणार आहे का, असा प्रश्न करत पोलिसांच्या इतरही महत्वाच्या प्रश्नांवर दानवेंनी सभागृहाचे लक्ष वेधले.
crime news : शिक्षिकेचा प्रताप! अल्पवयीन विद्यार्थ्याला फाइव स्टार हॉटेलमध्ये नेऊन करायची अत्याचार
पोलिसांची ड्युटी आठ तासांची असते. पण त्यांना दररोज किमाम १२ तास काम करावे लागते. मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी अर्ध्याहून अधिक पोलीस मुंबईच्या बाहेर वास्तव्यास आहेत. वसई, विरार, नवी मुंबई, पनवेलपासून ते कर्जत, कसारापर्यंत पोलिसांचे वास्तव्य पसरलेले आहे. त्यामुळे त्यांचे जवळपास १६ ते १८ तास प्रवास आणि ड्युटीमध्ये जातात. परिणामी त्यांना योगा आणि व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही. आकडेवारीनुसार सर्वाधिक पोलिसांचे मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्याने होतात, अशी माहिती अंबादास दानवे यांनी सभागृहाला दिली.
अंबादास दानवेंच्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, मुंबईत पोलिसांच्या मोडकळीस आलेल्या इमारतींचे नुतनीकरण होणार आहे. तसेच डीजी लोनचे प्रलंबित अर्ज निकाली काढले जाणार आहेत.