Suresh Dhass serious allegations on the administration of the Agriculture Department : कृषी विभागाच्या तत्कालीन कारभारावर सुरेश धस यांचे गंभीर आरोप
Mumbai : पिक विमा योजनेच्या घोटाळ्यामुळे राज्याचा कृषी विभाग चर्चेत आला आहे. पिक विमा घोटाळ्यामुळे यावर्षी नवीन कृषिमंत्र्यांनी जुनी योजना बदलली आहे. या कृषी विभागाच्या जुन्या कारभाराबद्दल आ. सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले आहेत, कृषी विभागात 20 वर्षापासून तेच ते अधिकारी कार्यरत आहेत त्यांचे पिक विमा कंपन्यांशी ‘साटे लोटे’ आहे असा थेट आरोप करत त्यांनी काही अधिकाऱ्यांची नावे ही विधानसभेत सादर केली असून अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेत कृषी आयुक्तालयातील अधिकारी व विमा कंपन्यांनी संगनमताने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी पावसाळी अधिवेशनात केलाय. पीक घोटाळ्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप त्यांनी केले आहेत. विनय आवटे नावाच्या व्यक्तीने खाजगी गुंतवणुकीतून व्याज कमावले, मात्र शेतकऱ्यांना विमा दिला नाही. कृषी सचिव कार्यालयातील काही अधिकारी विनय आवटेला मदत करत असल्याचा आरोप पण करण्यात आला आहे.
Abusive video viral : वाद, शिवीगाळ झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
आवटे हा कृषी मंत्रालयात 20 वर्षांपासून फिरतोय शेतकऱ्यांना विमा कसा मिळणार नाही, खासगी कंपन्यांना लाभ कसा होईल? असे कृषी अधिकारी वागत असेल. स्कायमेटची यंत्रणा उभी करत त्यांच्याकडून हफ्ते घेत हे होत असेल तर चुकीचं आहे. यासंदर्भात चौकशी व्हावी अशी मागणीही धस यांनी केली. विनय आवटेनं शेअरमध्ये विमा कंपन्यांनी गुंतवणूक केली. त्यांनी चुकीचे काम केले.आवटेंवर फसवणुकीचे लागू शकतं, कोणतेही कृषी आयुक्त आले तरी त्यांनाच चार्ज. 1 रुपयात विमा कोणाच्या काळात आला. कोण मंत्री होता. 2021 नंतर काय झाले तुम्ही बघा असेही त्यांनी सांगितले.
Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांच्याविरोधात पोस्ट टाकणे भोवले !
वर्धा, नागपूर अमरावती, जालन्यात देखील आमच्याच म्हणजे तत्कालीन कृषी मंत्र्यांच्या लोकांनी पिक विमा साठी पैसे भरले. या संदर्भातही त्यांनी सविस्तर माहिती दिली.पावसाळी अधिवेशनात पीक विमा घोटाळ्यावर गंभीर आरोप करण्यात आले. कृषी आयुक्तालयातील आणि कृषी सचिव कार्यालयातील काही अधिकारी विनय आवटेला मदत करत असल्याचा आरोप आहे. एक व्यक्ती 20 वर्षे पीक विम्याचे वाटोळे कसे करू शकते, असा प्रश्न उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी करण्यात आली. विनय आवटे मुख्य सांख्यिकी पदावर असून, इतर पदांवरही कार्यरत आहेत.
Land Fragmentation : जमिनींचे तुकडे पाडण्यासंबंधीच्या जटिल प्रश्नावर तोडगा निघणार !
एक रुपयात पीक विमा योजना ज्या कृषी मंत्र्यांच्या काळात आली, त्यांच्यापासून विनय आवटेपर्यंत सर्वांचे लागेबांधे असल्याचा दावा धस यांनी सभागृहात केला. खोटे शेतकरी आणि सरकारी, गायरान, वन खात्याच्या जमिनींवरही पीक विमे भरले गेल्याचे आढळले. तत्कालीन कृषी मंत्री यांच्यावरही आरोप आहेत. कृषी निविष्ठा, नॅनो युरिया, सोयाबीन आणि कापूस घोटाळ्याची तक्रार केल्यानंतर विनय आवटेलाच चौकशी समितीचा प्रमुख केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
मी तर म्हणेल आकाच हे सर्व चालवत होता. असा आरोपही आमदार सुरेश धस यांनी केला.
______