Breaking

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : भास्कर जाधव, आदित्य ठाकरे यांची अध्यक्षांसह विरोधकांवर आगपाखड !

 

Uproar in the House over Eknath Shindes criticism of Thackeray : एकनाथ शिंदेंच्या ठाकरेंवरील टीकेवर सभागृहात गोंधळ

Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज चर्चेवर सविस्तर उत्तर देताना महायुती सरकारची कामे स्पष्ट केली. यावेळी त्यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि विरोधकांच्या कामकाजाचा अहवाला देत जोरदार टीका केली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी याला उत्तर देण्याची तयारी दाखवली,मात्र प्रस्ताव दाखल करणारे आदित्य ठाकरे सभागृहात उपस्थित नसल्यामुळे इतरांना त्यावर बोलण्याची परवानगी देता येत नाही असा नियम अध्यक्षांनी दाखवला. तेव्हा भास्कर जाधव यांनी आक्रमक शैलीत अध्यक्षांसह विरोधकांवर हातवारे करत आरोप केले.

भास्कर जाधवांचा आवाज वाढल्यानंतर विरोधकांकडूनही त्यांना उत्तर दिले गेले. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. या गोंधळात आदित्य ठाकरे सभागृहात आले त्यांनी पण या गोंधळात भाग घेत विरोधकांकडे हातवारे करत त्यांना डिवचले. त्यामुळे गोंधळ अधिकच वाढला शेवटी दहा मिनिटा करता सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. पुन्हा सभागृह सुरू झाल्यावर जाधव आणि आदित्य यांनी केलेल्या कृत्या वरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. आदित्य ठाकरे उपस्थित असते तर मी त्यांना उत्तर देण्यासाठी परवानगी दिली असती असे अध्यक्षांनी नियम दाखवत पुन्हा स्पष्ट केले. पण नंतरही आदित्य ठाकरे अनुपस्थित असल्यामुळे अध्यक्षांनी हा विषय थांबवला.

Local Body Elections : ईव्हीएम पोहोचले, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला वेग!

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात खडाजंगी पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाने सभागृहात 293 अन्वये प्रस्ताव मांडला होता. त्याला उत्तर देण्यासाठी, अडवणूक करण्यात आल्याचा आरोप करत ठाकरे गट चांगलाच संतप्त झाला. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. भास्कर जाधव यांनी सभागृहाबाहेर येत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाकरेंवरील सातत्याने केल्या जाणाऱ्या टीकेवर घणाघाती प्रहार केला. यावेळी राहुल नार्वेकरांचा त्यांनी दुतोंडी अध्यक्ष आणि स्वतःला सरकार समजत असल्याची टीका केली.

Income tax department : ९.९७ कोटींच्या जीएसटी चोरीप्रकरणी अकोल्यातील व्यापाऱ्यास अटक

परवा सभागृहात चड्डी बनियन गँगच्या लोकांनी जे काही ओम फट स्वाह: केलं ते आपण सर्वांनी पाहिलंय. म्हणूनच मी हातवारे केले, माझ्यावर कारवाई करा असे म्हणत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही अनेक मुद्दे आणि प्रश्न सभागृहात उपस्थित केले, आम्ही जे विषय मांडले त्यावर नगरविकास मंत्री बोलले. म्हणूनच, तोंडवर गद्दार आणि नमक हराम बोललो. या मिंदेंचं नाव कुठेही घेतलं नव्हतं असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

____