Breaking

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : सोलर वीज उत्पादकांची फसवणूक होणार का? ऊर्जा विभागाने संदिग्धता दूर करावी !

Will the government change its policy regarding solar plants, asks BJP leader Sudhir Mungantiwar : ज्यांनी डिमांड भरली, त्यांना एजी पंप द्यावे

Mumbai : सोलर पॅनल्स लाऊन वीज निर्मितीच्या बाबतीत नागरिकांनी स्वयंपूर्ण व्हावे. प्रत्येक घरावर सोलर पॅनल लागावे, यासाठी सरकारने व्यापक जनजागृती केली. राज्यातील जनतेने सरकारच्या या आवाहनाला जोरदार प्रतिसाद दिला. केंद्र सरकारचे ७८ हजार रुपये अनुदान मिळत असल्यामुळे लोकांनी मोठ्या संख्येने सोलर प्लांट घरांवर बसवले. आज घराघरांवर, खासगी कार्यालयांवर सोलर प्लेट्स दिसतात. पण आता सरकार धोरण बदलवण्याच्या प्रयत्नांत असल्याच्या बातम्यांमुळे या वीज उत्पादकांमध्ये धाकधुक वाढली आहे.

यासंदर्भात आज (७ जुलै) सभागृहात पुरवणी प्रश्नावर चर्चा करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ऊर्जा विभागाने लोकांमधील एक भीती दूर केली पाहिजे. सरकार नेट मिटरींग धोरण बदलवण्याच्या प्रयत्नात असल्याच्या बातम्यांनी लोकांमध्ये धास्ती बसली आहे. सोलर प्लांट लावल्यावर नेट मिटरींगचा विचार केवळ दिवसाच केला जाईल, रात्रीच्या वेळी नेट मिटरींग होणार नाही. ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे. असे होत असेल तर ऊर्जा विभागाने यातील संदिग्धता दूर केली पाहिजे.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : सुधीर मुनगंटीवारांचा खत कंपन्यांनंतर OYOवरही हल्ला !

डिमांड भरलेल्यांना एजी पंप द्या..
शेतकऱ्यांच्या एजी पंपाचा विषय मुनगंटीवार यांनी आज पुन्हा लाऊन धरला. ते म्हणाले, एजी पंपाच्या संदर्भात गेल्या आठवड्यात मी अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. त्यानंतर राज्यभरातून मला दूरध्वनी आले. सर्वांची हीच मागणी आहे की, नवीन कनेक्शन नाही द्यायचे तर नका देऊ. पण ज्यांनी डिमांड भरली आहे, त्यांना कनेक्शन दिले पाहिजे. ऊर्जा विभागाने या बाबीचाही योग्य विचार करून निर्णय घ्यावा.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : जबरदस्तीने लिंकिंग खते घ्यायला लावत होते, मुनगंटीवारांनी दिला दणका !

८०० मेगावॅटचा संच सुरू करा..
चंद्रपूरमध्ये ८०० मेगावॅटचा संच सुरू करण्याची मागणी आम्ही ऊर्जा विभागाकडे सातत्याने करतोय. पण कार्यवाहीचा वेग कमी आहे. ऊर्जामंत्र्यांना विनंती आहे की या पॉवर प्रोजेक्टला गती द्यावी. ग्रंथालयाच्या संदर्भातही प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. मराठी भाषेचा जास्तीत जास्त उपयोग करण्यासाठी जगातील मराठी भाषकांनी मागणी केली आहे की, विदेशांतही मराठी भाषा समजता यावी, बोलता यावी, यासाठी राज्य सरकारने पोर्टल तयार करून विदेशातील लोकांना शिकता यावे, अशी व्यवस्था निर्माण करावी. सरकारने यावर ताबडतोब घोषणा करावी, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.