BJP leader Praveen Datke demands vacating the leased land by NIT in Nagpur : महानगरपालिकेचा मालमत्ता कर आणि नासुप्रचा भुभाटक कर, दोन्ही भरावे लागत आहेत
Mumbai : नागपूर या एकाच शहरात दोन नियोजन प्राधिकरण आहेत. त्यामुळे नागरिकांना दोन वेगवेगळे कर भरावे लागत आहेत. यामध्ये मोठा गोंधळ उडत आहे. नागपूर सुधार प्रन्यासची NIT जमीन भाडेपट्टीवर घेतली असलेले ५० हजार परिवार नागपुरात आहेत. त्यांच्याकडून शासकीय नियमांनुसार निधी घेऊन त्यांचे प्लॉट फ्री होल्ड करावे. लोकांना दिलासा देणारा हा निर्णय शासनाने हे अधिवेशन संपायच्या आत घ्यावा, असे भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात सभागृहात बोलताना प्रवीण दटके म्हणाले, शासनाच्या महसूल विभागाने नझूलच्या जमिनी फ्री होल्ड केल्या आहेत. महानगरपालिकेने आपल्या ताब्यातील जागा दोन टक्के आकारून फ्री होल्ड केल्या आहेत. त्याच धर्तीवर नागपूर सुधार प्रन्यासनेदेखील त्यांची मालकी असलेल्या आणि लीजवर नागरिकांना दिलेल्या जागा फ्री होल्ड करण्याबाबत भूखंड धारकांकडून सातत्याने मागणी होत आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या जागा फ्री होल्ड झाल्यामुळे नागपूर शरहातील ५० हजार कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे.
Ravikant Tupkar : उखडलेले रस्ते, साचलेले पाणी, घाणीचे साम्राज्य!
लोकप्रतिनिधींनी शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा घेणे सुरू आहे. मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांना लिहिलेल्या पत्रांत लोकप्रतिनिधींना नागपूर शहरातील दोन नियोजन प्राधिकरणांच्या वेगवेगळ्या कार्यपद्धतीकडे लक्ष वेधले आहे. राज्य सरकारने नझुलच्या जागांची मालकी, जनतेला देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महापालिकेनेही निर्णय घेतलेला आहे. आता NIT कडून हा निर्णय व्हावा, अशी मागणी आहे.
Local Body Elections : विधानसभेतील अंतिम मतदार यादीच ‘फायनल’!
राज्यमंत्र्यांचे आश्वासन..
५५,७१९ भुखंडांचा प्रस्ताव शासनाला प्राप्त झाला असून तो विचाराधिन आहे. लवकरच प्रस्तावाला मान्यता देणार असल्याचे आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहाला दिले.