Breaking

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : ‘कोरोमंडल’वर केवळ एफआयआर करून चालणार नाही, तर अधिकाऱ्यांना अटक करा !

BJP leader Sudhir Mungantiwar’s pursuit to arrest Coromandel officials : लिंकिंवर बंदी घाला आणि धान खरेदीचा लक्षांक वाढवा

Mumbai : खतांचे लिंकिंग करून शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या कोरोमंडल कंपनीच्या विरोधात राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हत्यार उपसले आहे. शनिवारी (५ जुलै) त्यांनी बल्लारपूर पोलिस स्टेशनमध्ये कंपनीच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर या कंपनीच्या विरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मुनगंटीवार यांनी अधिक आक्रमक होत केवळ एफआयआर करून चालणार नाही, तर कंपनीच्या अधिकाऱ्यांना अटक झाली पाहिजे, ही मागणी जोरकसपणे लाऊन धरली आहे.

यासंदर्भात सभागृहात पुरवणी चर्चेदरम्यान बोलताना मुनगंटीवार म्हणाले, अशा कंपन्यांचे मालक आर्थिक दृष्या सक्षम असतात. त्यामुळे केवळ एफआयआर दाखल करून येवढ्यावरच थांबणे पुरेसे नाही, तर शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करणाऱ्या कंपनीच्या विरोधात कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे आणि तात्काळ अटकेची कारवाई करणे आवश्यक आहे. राज्यात कुठेही शेतकऱ्यांनी लिंकींगसंदर्भात तक्रार केली, तर कंपनीवर तात्काळ गुन्हे दाखल करुन अधिकाऱ्यांना अटक केली जावी. नाहीतर महाराष्ट्रात शेतकऱ्यांची फसवणूक थांबवणे अशक्य होऊन बसेल.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : मुनगंटीवार म्हणाले, मुख्यमंत्री धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी देशात प्रसिद्ध !

१९५५च्या कायद्यात काही दुरुस्त्या करण्यात याव्या, अशी शिफारसही मुनगंटीवार यांनी केली. याशिवाय शेतकऱ्यांवर खते, बियाणे आणि अन्य कृषी निविष्ठांच्या खरेदीच्या वेळी जबरदस्तीने इतर उत्पादने खरेदी करण्यास भाग पाडणारी लिंकिंग पद्धत खुलेआम सुरू आहे. ही पद्धत तात्काळ बंद करण्याची मागणीही त्यांना लाऊन धरली.