Breaking

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती’ की ‘शोषण शक्ती’?

Live worms found in millet bar under the PM POSHAN scheme : FDAकडून तपासणी न करता पुरवठा झालाच कसा?, आमदार वडेट्टीवारांचा सवाल

Mumbai : राज्यातील कुपोषण संपवण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पण या पैशांचा उपयोग योग्य रितीने होतो आहे की नाही, हे बघण्याची यंत्रणा कदाचित आपल्याकडे नसावी. त्यामुळे वारंवार विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचे प्रकार होतात. अशीच एक घटना पुन्हा धाराशिव तालुक्यामध्ये घडली आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना’ राबवली जाते. पण प्रधानमंत्र्यांची ही ‘पोषण शक्ती’ आहे की ‘शोषण शक्ती’, हेच कळेनासे झाले आहे, असे काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी म्हटले आहे.

वडेट्टीवार यांनी सभागृहात मिलेट बारमध्ये जिवंत अळ्या निघाल्याचा मुद्दा उपस्थित केला. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मिलेट बार देण्यात येतात. धाराशिव तालुक्यातील पाच शाळांमध्ये या बारमध्ये जिवंत अळ्या निघाल्या. सतत दोन दिवस हा प्रकार घडला. हा चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे, असे म्हणत वडेट्टीवार आक्रमक झाले. FDAने तपासणी न करता याचा पुरवठा झालाच कसा, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

MLA Gopichand Padalkar : पडळकरांवर गुन्हा दाखल करा, वादग्रस्त वक्तव्याचा निषेध

पनवेल येथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये गर्भवती महिला आणि बालकांना दिला जाणार पोषण आहारही निकृष्ट आहे. आहाराचे पाकिट उघडताच त्यातून घाण वास येतो, त्यात मुंग्या असतात. असा पोषण आहार घरी न आणलेलाच बरा, असे विद्यार्थ्यांचे मत झाले आहे. यामध्येही मोठा भ्रष्टाचार आहे. पोषण आहारात जर असा भ्रष्टाचार होत असेल तर कंत्राटतारांवर कारवाई करण्यात आली पाहिेजे. त्यांना काळ्या यादीत टाका, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.