Breaking

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : गोवंशाचे मुंडके कापून फेकले, प्रवीण दटके आक्रमक !

MLA Praveen Datke is aggressive over the cow slaughter incident : वाऱ्यासारखी पसरली गोवंशाची कत्तल झाल्याची बातमी

Mumbai : ‘ज्याचे नाही कुणी, त्याने जावे वणी..’ ही कविता प्रसिद्ध आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहराचा सांस्कृतिक वारसा मोठा आहे. पण गेल्या काही वर्षात या शहरात अवैध धंदे जोमाने फोफावले. ११ जानेवारीला येथील दिपक टॉकीज चौपाटी परिसरात सार्वजनिक ठिकाणी गोवंशाचे मुंडके कापून फेकण्यात आले. गोवंशाची कत्तल झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला.

गोवंशाचे मुंडके कापून फेकल्यानंतर १४ जानेवारीला अवैध बिर्याणी सेंटरमधून गोवंश मासाची बिर्याणी करून ती विक्री करत असल्याची आणि मंजुषा बार जवळ गोवंश आणि तसेच वंशाचे मास पोत्यात बांधून टाकले असल्याची बातमी पसरली. पोलिसांना गोवंश मिळाले असतानासुद्धा कत्तलखाना नष्ट करण्यासाठी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवीण दटके यांनी आक्रमक झाले आणि सभागृहात आवाज उचलला.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : भास्कर जाधव, आदित्य ठाकरे यांची अध्यक्षांसह विरोधकांवर आगपाखड !

सदर जागेची व्हिडिओग्राफी करणे तसेच अतिक्रमित जागेवर बांधलेले शेड नष्ट न करणे याबाबत पोलिसांकडून दिरंगाई झाल्याचे दटके यांनी म्हटले आहे. पोलिसांनी आरोपींवर कारवाई न करता फक्त पुरावे नष्ट करून निष्काळजीपणे वर्तणूक केल्यामुळे गोवंश तस्करांना पाठबळ मिळत असल्याचे देखील दटके यांनी सांगितले.

Local Body Elections : ईव्हीएम पोहोचले, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला वेग!

याबाबत त्वरित दखल घेऊन गोवंशाची कत्तल करणाऱ्यावर कारवाई करावी. तसेच गोमांस विक्री करणाऱ्या हॉटेल आणि आस्थापनांवर कारवाई करावी, अशी मागणी दटके यांनी केली. यावेळी सदर घटनेची नोंद घेऊन तात्काळ दोषींवर कारवाई करू तसेच ज्या हॉटेलमध्ये गोमांस विक्री होत आहे, त्यांचे लायसन्स रद्द करू असे आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.