MLA Siddharth Kharat alleges that the government is insensitive towards farmers : शेतकरी आत्महत्या, औद्योगिक दुर्लक्ष आणि लोणार सरोवराच्या उपेक्षेवर विधानसभेत ठाम भूमिका
Buldhana “फक्त भाषणं करून शेतकरी सुखी होत नाही. सरकारने आता जमिनीवर काम करून दाखवावं. अन्यथा जनता विचारेल – तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात की केवळ वक्ते?” या शब्दांत ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सरकारला धारेवर धरले.
“कोऱ्या कागदावर भाषणं लिहणं सोपं आहे, पण मातीला हिरवं करणं खऱ्या नेतृत्वाची कसोटी आहे!” अशा परखड शब्दांत खरात यांनी सत्ताधाऱ्यांवर विधानसभेत जोरदार हल्ला चढवला. शेतकरी आत्महत्या, औद्योगिक मागासलेपण, ग्रामीण विकासाची गती आणि लोणार सरोवराच्या दुरवस्थेवर त्यांनी बोट ठेवले.
Ravikant Tupkar : हुमणी अळीच्या कहरामुळे सोयाबीन पीक धोक्यात; तुपकरांचा मुख्यमंत्र्यांकडे धावा
आ. खरात म्हणाले, “जानेवारी ते जून २०२५ या सहा महिन्यांत राज्यात १२६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विकासाच्या गप्पा सुरू असताना शेतकऱ्यांचा मृत्यू का होतो?” हमीभाव, कर्जमाफी आणि उत्पन्न दुप्पट होण्याच्या आश्वासनांची पूर्तता झालेली नसल्याने शेतकरी अडचणीत सापडतोय, हे त्यांनी ठसठशीतपणे मांडले.
औद्योगिक धोरणावर सवाल – मेहकर एमआयडीसीचा मुद्दा ऐरणीवर
“राज्यातील केवळ ९ जिल्हेच औद्योगिकदृष्ट्या विकसित झाले असून, उर्वरित २७ जिल्ह्यांत विकासाचा अभाव आहे. त्यातील १२ जिल्हे अतीमागास आहेत,” असे खरात म्हणाले. मेहकर एमआयडीसीची अवस्था आणि त्यात झालेल्या अतिक्रमणावर त्यांनी संताप व्यक्त करत शेतीवर आधारित उद्योगांसाठी स्वतंत्र अधिकारी व ३०० एकर अतिरिक्त जागेची मागणी केली.
Vanchit Bahujan Aghadi : वंचितची रिपब्लिकन सेनेशी फारकत; महायुतीतील युतीला तीव्र विरोध
लोणार सरोवराची उपेक्षा – ‘लोकशाहीची थट्टा’ असल्याचा आरोप
५२ हजार वर्षांपूर्वीच्या उल्कापाताने निर्माण झालेल्या जागतिक दर्जाच्या लोणार सरोवराकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. वन, पर्यटन व पुरातत्व विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने विकास रखडल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. ‘या सरोवरासाठी स्थापन समितीत लोकप्रतिनिधींनाच स्थान नाही, ही लोकशाहीची थट्टा आहे,’ अशी गंभीर टीकाही त्यांनी केली.