Minister Girish Mahajan announced the salary of teachers : चार दिवसांपासून आझाद मैदानावर सुरू होते आंदोलन
Mumbai : राज्य सरकारने शब्द देऊनही विनाअनुदानित शिक्षकांचे पगार अडकलेले होते. त्यामुळे इतर काहीच मार्ग शिल्लक नसल्याने या शिक्षकांनी गेल्या चार दिवसांपासून मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले होते. शिक्षक मागे हटत नसल्याचे पाहून सरकारने नमते घेतले आणि शिक्षकांच्या सर्व मागण्या मान्य करणार असल्याची घोषणा केली.
राज्य सरकारने ऑक्टोबर २०२४ मध्ये विनाअनुदानिक शिक्षकांना टप्पा अनुदान लागू केले होते. नेहमीप्रमाणे घोषणा झाली पण सरकारने पगारासाठी निधी दिला नाही. टप्पा अनुदानाचा निर्णय झाल्यानंतर दोन अधिवेशने झाली. पण शिक्षकांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. आता तिसरे अधिवेशनही सुरू झाले. पण पगाराबाबत सरकारकडून काहीही हालचाली झाल्या नाहीत. सरकारने पुरवणी मागणीदेखील सादर केली नाही. त्यामुळे शिक्षकांना आक्रमक होत धरणे आंदोलन सुरू केले होते. आता त्यांच्या आंदोलनाला यश आले आहे.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार स्वतः करणार जुनगाव पुरग्रस्त भागाची पाहणी !
मंत्री गिरीश महाजन यांनी शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्याची घोषणा केली. शिक्षकांना संबोधित करताना ते म्हणाले की, आपण सर्वजण सामान्य कुटुंबीताली आहात. तुमच्यासाठी त्यावेळीही देवेंद्र फडणवीसांनी धाडसी निर्णय घेतला. कारण सरकारला तुमची काळजी आहे. २० टक्के, ४० टक्के आणि ६० टक्के सरकारने दिले. मात्र गेल्या काही काळापासून सरकारच्या तिजोरीवरील ताण अधिकच वाढला आहे. सरकार नवनव्या आर्थिक संकटांना तोंड देत आहे. त्यामुळे पुढचे टप्पे देण्यास उशीर झाला. पण आता लवकरच तुमचे पगार केले जाणार आहेत.
Sanjay Shirsat : आयकरची नोटीस, शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना धक्का
सर्वप्रथम शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न मार्गी लावण्यात आलेला आहे. शिक्षकांच्या खात्यात पगाराची रक्कम जमा करायची आहे. त्यासाठी येत्या दोन-चार दिवसांत तांत्रिक बाजंचा अभ्यास करून. पावसाळी अधिवेशन संपन्यानंतर तुमच्या खात्यात पगाराची रक्कम आलेली असेल. यामध्ये कोणताही बदल होणार नाही, अशी ग्वाही मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.