Breaking

Maharashtra Legislative Council Monsoon Session : विधान परिषदेतच जुंपली ‘ बाहेर ये तुला दाखवतो,’

Shambhuraj Desai got angry when Anil Parab called him a traitor : अनिल परबांनी ‘गद्दार’ म्हणताच शंभूराज देसाई भडकले,

Mumbai : मुंबईत मराठी माणसाला घरांसाठी आरक्षण मिळावे, या मुद्द्यावर मंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यात सभागृहात चकमक उडाली. मराठी माणसाला मुंबईत घरांसाठी आरक्षण मिळावे, यासाठी कायदा करण्यात यावा, अशी मागणी अनिल परब यांनी केली. मात्र, यावरून वादाला सुरुवात झाली आणि शंभूराज देसाई यांनी अनिल परबांना ‘ बाहेर ये तुला दाखवतो,’ अशी धमकी दिली. यानंतर सभागृहात गोंधळ उडाला आणि उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सभागृह १० मिनिटांसाठी तहकूब केले.

सभागृहात बोलताना आमदार अनिल परब यांनी मुंबईत मराठी माणसाच्या घरांचा मुद्दा उपस्थित केला. मुंबईतील प्रत्येक नवीन इमारतीत बिल्डरने 40 टक्के घरे मराठी माणसांसाठी राखीव ठेवावीत, यासाठी सरकार कायदा करणार आहे का? असा प्रश्न परब यांनी विचारला. यावर उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले की, मुंबईत मराठी माणसाला सन्मान मिळावा, ही जशी तुमची भावना आहे. तीच आमचीही भावना आहे. परंतु, 2019 ते 2022 या काळात तुमचे सरकार असताना हा कायदा का केला नाही? तुमच्या सरकारने मराठी माणसाकडे दुर्लक्ष केले, असे देसाई म्हणाले.

Sanjay Shirsat : आयकरची नोटीस, शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना धक्का

 

यानंतर अनिल परब यांचा चांगलाच पारा चढला आणि त्यांनी शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.आमच्या सरकारमध्ये तुम्हीही मंत्री होता. मग तुम्ही तेव्हा काय करत होता? तुम्ही जेव्हा सरकारमध्ये होता, तेव्हा गद्दारी कशी करायची हे ठरवत होता, असे परब म्हणाले. परब यांनी गद्दार शब्दाचा उल्लेख केल्याने शंभूराज देसाई प्रचंड संतापले. तू गद्दार कोणाला बोलतो. तू बूट चाटत होता. बाहेर ये तुला दाखवतो, अशी धमकी त्यांनी परब यांना दिली. यावरून सभागृहात एकच गोंधळ झाला. त्यामुळे अखेर नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले.

Eknath Shinde : अधिवेशनाच्या धामधुमीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत

यानंतर याविषयी बोलताना शंभूराज देसाई यांनी सांगितले की, प्रश्न उत्तर सुरू असताना मी प्रश्नाला उत्तर देत होते. त्यावेळी मी उद्धव ठाकरे यांचा नेतृत्वातील सरकारचा उल्लेख केला. तेव्हा परत चिडले कारण त्यांनी तेव्हा मराठी माणसांच्या घराचा मुद्दा घेतलेला नव्हता. त्यांनी मला गद्दार म्हणल्यामुळे मी चिडलो. हे वारंवार अशा प्रकारे अडथळे आणतात. त्यामुळे मला उत्तर द्यावे लागले. यांचा उमेदवारापेक्षा आणि चांगली मते घेऊन निवडून येतो. असेही देसाई यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

___