Will not tolerate compulsion of Hindi language : मुख्याध्यापकांना पत्र लिहून हिंदीचा विरोध करण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना
Akola राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी स्वीकारण्याचे धोरण अवलंबिल्यानंतर याला समाजाच्या विविध स्तरातून विरोध सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) MNS पक्षप्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांनी महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहून तिसऱ्या भाषेच्या स्वरूपात हिंदीला विरोध करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, अकोला जिल्हा परिषद शालेय शिक्षण विभागाने अद्याप तिसऱ्या भाषेबाबत कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. पुस्तकेदेखील वितरित करण्यात आलेली नाहीत. मात्र, काही खासगी विनाअनुदानित शाळा विद्यार्थ्यांकडून हिंदी भाषा शिकण्यासाठी जबरदस्तीने पुस्तके घेण्यास भाग पाडत असल्याची तक्रार आहे.
Local Body Elections : आचारसंहितेपूर्वी डीपीएसी कामांना गती; विकासकामे मार्गी लागताहेत
ही बाब मांडण्यासाठी अकोला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची भेट घेण्यासाठी कार्यालय गाठले असता, ते अनुपस्थित होते. उपस्थित कार्यालयीन अधिकाऱ्यांनी या विषयावर टाळाटाळ केली. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षणाधिकारी दालनातच ठिय्या आंदोलन सुरू केले व जबाबदार अधिकारी येईपर्यंत तिथेच बसण्याचा निर्णय घेतला.
प्रशासनाने याची गंभीर दखल घेत पंचायत समितीचे केंद्रप्रमुख यांना बोलावून तत्काळ खासगी शाळांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. तपासणी दरम्यान हॉली क्रॉस कॉन्व्हेंट शाळेत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवली जात असल्याचे मान्य करण्यात आले. याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार असल्याचे केंद्रप्रमुखांनी सांगितले.
Tribal Pardhi : पाणगाव ग्रामपंचायतीचा ‘तो’ ठराव अखेर रद्द ! ‘सत्तावेध’ इम्पॅक्ट
सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवत मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद प्रवेशद्वाराजवळ हिंदी पुस्तकांची होळी केली. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, उपजिल्हाध्यक्ष सतीश फाले, शहराध्यक्ष सौरभ भगत, मनविसे जिल्हाध्यक्ष रणजित राठोड यांनी केले. यावेळी तालुका अध्यक्ष विजय बोचरे, उपशहर अध्यक्ष मुकेश धोंडफळे, मनविसे उपजिल्हाध्यक्ष गोपाल मुदगल, तालुकाध्यक्ष सौरभ फाले, राजेश राठी, अमोल भेंडारकर, सतीश खाकरे, हर्षल अंभोरे, प्रदीप आखरे, शेखर स्वर्गीव, अजय सरकटे, नारायण मेहरे, सम्यक सावळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.