Breaking

Maharashtra Police : १२२ जणांनी नाकारली पोलिसाची नोकरी!

 

122 people rejected the police job

: वर्दी चढवायच्या ऐनवेळी निवड रद्द करण्यासाठी अर्ज

Mumbai सरकारी नोकरी करण्याची हौस सर्वांनाच असते. पण पोलीस होण्यासाठी कष्ट करावे लागतात. अर्ज केला, मुलाखत दिली आणि पोलिसाची वर्दी चढवली, असं होत नाही. मैदानावर स्वतःची शारीरिक क्षमता सिद्ध करावी लागते. याशिवाय बुद्धीचाही कस लागतो. एवढे कष्ट करून ऐन वर्दी चढवायच्या वेळी कुणी नोकरी नाकारली, तर त्याचं आश्चर्य वाटणारच. १२२ जणांनी असाच आश्चर्याचा धक्का महाराष्ट्राला दिला आहे.

गेल्यावर्षी मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या १२२ तरुण-तरुणींनी स्वतःची निवड रद्द करण्याची लेखी विनंती केली. आणि पोलीस दलात रुजू होण्यास नकार कळविला होता, अशी माहिती उघडकीस आली आहे. अंगावर वर्दी घालून देशसेवा करणे अनेकांचे स्वप्नसुद्धा असते. मात्र, राज्य पोलीस दलात निवड झाल्यानंतरही अनेक युवक-युवतींनी रुजू होण्यास नकार देतात. या उमेदवारांनी वेगवेगळी कारणे देऊन स्वतःची निवड रद्द करण्याची विनंती केली.

Kalmeshwar accident: कळमेश्वरमधील बारूद कारखान्यात स्फोट

 

राज्य पोलीस दलात विविध पदांवर पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मुंबई पोलीस दलात २०२१ मध्ये पोलीस शिपाई आणि पोलीस चालक पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये जवळपास लाखांवर तरुण-तरुणींनी पोलीस भरती अर्ज केला होता. मुंबई पोलीस भरतीचा अर्ज भरल्यानंतर शेकडो युवक आणि युवतींनी क्लासेस लावले. वाचनालयात जाऊन अभ्यास करणे सुरु केले. मैदानावरही गोळाफेक, लांब उडी, उंच उडी इत्यादी प्रॅक्टीस सुरु केली होती.

पोलीस भरतीची परीक्षा जवळ आली आणि तरुणांनी तयारी पूर्ण करीत परिक्षा दिली. पोलीस भरतीच्या लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणीत संभाव्य उमेदवारांची निवड झाली. त्यातून पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई म्हणून अंतिम निवड झालेल्या तरुण-तरुणींची यादी जाहीर करण्यात आली. अनेक युवक अंगावर वर्दी लवकरच चढणार म्हणून उत्साहात होते. तर काही युवकांना मात्र पोलीस दलात नोकरी करण्याची इच्छा नव्हती.

Harshawardhan Sapkal : नेत्यांच्या घोडेबाजाराला आळा घालणार !

काहींना वेगवेगळ्या कारणास्तव मुंबई पोलीस दलात रुजू व्हायचे नव्हते. पोलीस शिपाई पदावर निवड झालेल्या ९६ युवक-युवतींनी मुंबई पोलीस दलात नोकरी करण्यास स्वतःहून नकार कळविला. तर चालक पदावर निवड झालेल्या २६ तरुणांनीसुद्धा नकार कळविला. अशा सर्व १२२ तरुण-तरुणींनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून निवड रद्द करण्याची विनंती केली. त्यामुळे १२ एप्रिल २०२४ ला एक प्रसिद्धीपत्रक काढून अंतिम निवड रद्द केल्याची घोषित केले आहे.

Hasan Mushrif : मुश्रिफांना विश्वास, राज्य होईल Medical tourism centre !

कौटुंबिक कारणे केली पुढे
पोलीस दलासह इतर परीक्षांमध्येही यश आले म्हणून नोकरीस नकार देणारे आहेत. पण मुंबईत नोकरी करायची नाही म्हणून कौटुंबिक कारणे देणाऱ्यांची संख्या जास्त आहे. याशिवाय अन्य काही खासगी कारणं देऊनही स्वतःची निवड रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.