Maharashtra Police : हवालदार झाले Inspector!

496 constables promoted as sub-inspector : राज्यातील ४९६ हवालदारांची पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

Nagpur राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या शेकडो जागा रिक्त असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा ताण पोलीस अधिकाऱ्यांवर वाढला होता. त्यामुळे पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील ४९६ पोलीस हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती दिली. तसेच राज्यातील ४२ सहायक पोलीस निरीक्षकांनाही पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली.

राज्य पोलीस दलात उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या शेकडो जागा रिक्त आहे. त्यामुळे उपलब्ध पोलीस अधिकाऱ्यांवर कायदा व सुरक्षेबाबत ताण येत होता. तसेच एकाच अधिकाऱ्यांकडे किमान ५ ते १० गुन्ह्यांचा तपास देण्यात येत असल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या करणे अनिवार्य होते. मात्र, गृहमंत्रालय आणि महासंचालक कार्यालयात समन्वयाचा अभाव असल्यामुळे पदोन्नत्या रखडल्या होत्या.

Crime in Nagpur : पाळीव कुत्र्याने शोधला मालकाचा मृतदेह!

त्याची पोलीस महासंचालक कार्यालयाने दखल घेऊन सोमवारी २०१३ अर्हता परीक्षा उत्तीर्ण ४९६ हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती दिली. तसेच ४२ सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली. बहुप्रतीक्षित पदोन्नतीची यादी जाहिर झाल्यामुळे राज्यभरातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Crime in Khamgao : शेगावात मुख्याध्यापिकेला लाच घेताना रंगेहाथ पकडले!

गेल्या सहा महिन्यांपूर्वीच पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली होती. त्यामुळे अधिकारी पदाची लागणारी वर्दी, कॅप, शूज व इतर तर साहित्य घेऊन ठेवले होते. परंतु, पदोन्नतीस विलंब होत असल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. आता महासंचालक कार्यालयाने सकारात्मकता दाखवून पदोन्नतीची यादी जाहीर केली. त्यामुळे नवचैतन्य निर्माण झाल्याची प्रतिक्रिया आयुक्तालयातील एका पोलीस हवालदाराने दिली.