clear that the displeasure towards Ajit Pawar has ended : अजित पवार यांच्यासोबत दुरावा नसल्याचेही केले स्पष्ट
Pune: राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीमुळे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेलां विराम मिळाला आहे. यातच एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री संजय शिरसाठ यांनी या भेटीचा संदर्भ देत ‘उद्धव ठाकरे यांनी मला बोलावले तर मी नक्कीच भेटायला जाईल’ असे म्हणले आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्यावरील नाराजी संपली असून आमच्यात आता कोणताही दुरावा नाही असेही स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी बोलावल्यास भेटायला जाईन. मात्र, याचा राजकीय अर्थ काढू नये, असा इशाराही त्यांनी दिला. अजित पवार यांच्यासोबतची नाराजी दूर झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चां सुरू झाल्या आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींत वेगळी चर्चा घडवणारे वक्तव्य शिरसाट यांनी पुण्यात केलं. ‘जर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला भेटायला बोलावलं, तर मी नक्की त्यांच्या भेटीला जाईन, असं मोठं विधान त्यांनी केलं. मात्र त्यांनी याचं राजकीय अर्थ काढू नये असेही म्हणले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला विषय मिळाला आहे.
Rohit Pawar : जसे काही भाजप नेते स्वतःच बंदुका घेऊन लढायला गेले होते !
शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चांना काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीनं नव्यानं सावध प्रतिक्रिया देत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक नेते व्यक्त पण होत आहेत. यासंदर्भाने बोलताना शिरसाठ यांनी कोणी कोणाला भेटू शकतो प्रत्येक भेटी मागे राजकीय अर्थच काढणे योग्य नाही असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वीच सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा वापर ‘लाडकी बहिण योजना’साठी वळवल्यामुळे नाराजी व्यक्त झाल्याच्या चर्चा होत्या. मात्र या पार्श्वभूमीवर बोलताना संजय शिरसाट म्हणाले,’अजित पवार यांच्याशी भेट झाली आहे आणि त्याबाबतची माझी नाराजी संपली आहे. आता आमच्यात कोणताही दुरावा नाही.’
शिरसाट म्हणाले, ‘ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र यावं यासाठी सर्वप्रथम शुभेच्छा आम्हीच दिल्या होत्या. राजकारणात कोणाचंही एकत्र येणं थांबवावं, असं आम्हाला वाटत नाही. मी स्वतः राज ठाकरे यांना भेटायला गेलो होतो. उद्या जर मला उद्धव साहेबांनीही बोलवलं, तर मी त्यांच्या भेटीलाही जाईन. यात वेगळा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू किंवा वेगळं समीकरण नसणार आहे. हा सर्वस्वी सौहार्दाचा भाग आहे.असेही त्यांनी स्पष्ट केलं.
_____