Maharashtra politics : ‘उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे’ मजकुरामुळे राजकारण तापले !

Controversial banner of North Indian sena outside Matoshree : मातोश्रीबाहेर उत्तर भारतीय सेनेचा वादग्रस्त बॅनर

Mumbai : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच राज्याचे राजकीय हालचाली वाढत असून, या पार्श्वभूमीवर मुंबईत उत्तर भारतीय सेना या संघटनेने लावलेल्या एका वादग्रस्त बॅनरमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या बॅनरवर लिहिलेल्या मजकुरामुळे भाषिक आणि प्रादेशिक राजकारणाच्या मुद्द्यावरून मुंबईतील वातावरण ढवळून निघाले आहे.

राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी पार पडणार आहेत, तर 3 डिसेंबरला मतमोजणी होईल. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तथापि, मुंबईतील काही महत्त्वाच्या ठिकाणी – अंधेरी, वांद्रे, शिवाजी पार्क, मातोश्री, शिवतीर्थ आणि शिवसेना भवन परिसरात झळकलेल्या उत्तर भारतीय सेनेच्या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

Local body election : स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका पुढे ढकलण अशक्य !

या बॅनरवर “सावधान! उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे” असा धमकीवजा मजकूर लिहिला असून, त्यासोबत “महाराष्ट्र से बिहार तक, राजस्थान से यूपी तक” अशी घोषणा दिली आहे. बॅनरच्या खाली उत्तर भारतीय सेना आणि तिचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांचा फोटोही झळकत आहे. या वादग्रस्त घोषणेमुळे मुंबईत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या बॅनरमागील उद्देश उत्तर भारतीय मतदारांना एकत्र ठेवण्याचा असल्याचे सांगितले जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय मतदारांना कोणत्याही परिस्थितीत विभागू न देण्याचा इशारा या बॅनरच्या माध्यमातून देण्यात आल्याचे बोलले जात आहे. विशेषतः मुंबई आणि ठाणे परिसरात उत्तर भारतीय मतदारसंख्येचा प्रभाव लक्षणीय असल्याने या घोषणांना राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

Loan waiver : आताच्या आता कर्जमुक्ती करा, तातडीने हेक्टरी ५० हजार द्या !

उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला हे गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील उत्तर भारतीय समाजाच्या हक्कांसाठी आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांविषयी केलेल्या भाषणांना विरोध दर्शवला असून, वेळोवेळी न्यायालयातही दाद मागितली आहे. मात्र आता त्यांच्या संघटनेने लावलेल्या या बॅनरमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या प्रकरणी पोलिसांकडून बॅनर लावण्यामागील परवानगी व कायदेशीर प्रक्रिया याबाबत तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या वादग्रस्त बॅनरमुळे मुंबईतील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा ‘महाराष्ट्र विरुद्ध बाहेरचे’ हा मुद्दा चर्चेत आला आहे.