Maharashtra politics : शिंदे सेनेचे 22 आमदार भाजपकडे ?

Fadnavis strong counterattack on Aditya Thackeray allegations : आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर फडणवीसांचा जोरदार पलटवार

Nagpur: वंदे मातरम् या राष्ट्रगीताच्या संसदेतील चर्चेवरून सुरू झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना काँग्रेस, आदित्य ठाकरे आणि शिवसेना-भाजपा संबंधांवर थेट प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की वंदे मातरम् हे केवळ गीत नसून भारताच्या स्वातंत्र्याचे आणि राष्ट्रवादाचे महामंत्र आहे. “ज्या मंत्राने कित्येक क्रांतिकारकांना फाशीच्या दारातही ताठ उभे राहायला सामर्थ्य दिले, त्याच गीताच्या १५० वर्षांवर संसदेत चर्चा होणे स्वाभाविक आहे,” असे फडणवीस म्हणाले. त्यांनी यावेळी विधानसभेतही पूर्ण वंदे मातरम् गायले असून, पुढील अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याचे सांगितले.

वंदे मातरम् घोषणेवर अडथळा आणला गेला आणि राष्ट्रीय घोषणांवर भाजपचा एकाधिकार प्रस्थापित केला जात असल्याचा आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपावरही फडणवीसांनी प्रतिउत्तर दिले. “वंदे मातरम् वर कधीही बॅन लागलेला नाही. काही आघात झाले असतील तर त्यासाठी काँग्रेसच जबाबदार आहे. काँग्रेसने प्रस्ताव पारित करून वंदे मातरम् चे तुकडे केले आणि केवळ अर्धेच गीत गायलं जाईल अशी अट घातली. आज त्याच काँग्रेससोबत राहून आदित्य ठाकरे भाजपवर आरोप करतात, त्याऐवजी त्यांनी हा प्रश्न काँग्रेसला विचारायला हवा,” असे फडणवीस म्हणाले. त्यांनी हेही स्पष्ट केले की भाजपच्या कार्यकाळात वंदे मातरम् चा नेहमीच सन्मान आणि गौरव केला गेला आहे.

Nagpur Winter Session 2025: अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची जाधव, पटोलेंची मागणी

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे तब्बल २२ आमदार भाजपात जाण्याच्या तयारीत असल्याचा आदित्य ठाकरे यांनी केलेल्या विधानावरूनही राजकीय वातावरण तापलं आहे. परंतु या दाव्यावर फडणवीसांनी जोरदार पलटवार केला. “म्हणण्याकरिता उद्या कोणी हेही म्हणू शकेल की आदित्य ठाकरे यांच्या २० आमदारांनी भाजपच्या संपर्कात आहोत असं सांगितलं. काही बोलण्याने गोष्ट खरी होत नाही. आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन काय करायचं आहे?” असा सवाल त्यांनी केला.

PM narendra Modi : मुस्लिम लीग, नेहरू… वंदे मातरम् राष्ट्रगानाच्या चर्चेत

फडणवीसांनी पुढे स्पष्ट केले की शिवसेना (शिंदे गट) आमचा मित्र पक्ष आहे आणि खऱ्या शिवसेनेसोबतच भाजपा आहे. “मित्र पक्षाचे आमदार पळवून राजकारण करणं हे आमचं तत्त्व नाही. उलट शिवसेना मजबूत झाली पाहिजे यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत. शिवसेना, भाजपा आणि महायुती भविष्यात आणखी मजबूत स्वरूपात दिसेल,” असे त्यांनी सांगितले.

वंदे मातरम् विवाद आणि २२ आमदारांच्या चर्चेतून सुरू झालेल्या या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातच राजकीय तापमान चांगलेच वाढले असून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील पुढील टप्प्यातील शब्दयुद्धाकडे राज्याची उत्सुकता लागली आहे.