Maharashtra politics : महापालिका निवडणुकीत दोन राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत !

Sharad Pawar clarifies decision to fight as Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडी म्हणूनच लढण्याचा निर्णय शरद पवारांकडून स्पष्ट

Pune: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी चर्चा असलेल्या “दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का?” या प्रश्नावर अखेर पूर्णविराम लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात तसेच राज्यातील महापालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढवण्याचा स्पष्ट निर्णय घेतल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार गटातील कार्यकर्ते काही ठिकाणी एकत्र निवडणूक लढवत असल्याची उदाहरणे समोर येत होती, त्यामुळे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, प्रशांत जगताप आणि शरद पवार यांच्यात आज झालेल्या सखोल चर्चेनंतर ही चर्चा थेट संपुष्टात आली आहे.

प्रशांत जगताप यांनी आज शरद पवार यांची भेट घेऊन पुणे महापालिका निवडणुकीचा सविस्तर आढावा सादर केला. महानगरपालिकेत महाविकास आघाडीने लढल्यास निवडणुकीच्या निकालांमध्ये कोणते बदल होऊ शकतात आणि इतर पक्षांसोबत युती केल्यास काय परिणाम होऊ शकतात, याचा लेखा जोखा पवारांसमोर मांडण्यात आला. चर्चेनंतर शरद पवार यांनी स्पष्ट निर्देश दिले की पुणे आणि राज्यातील इतर सर्व महापालिका निवडणुका महाविकास आघाडीच्या स्वरूपातच लढवल्या जातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) स्वतंत्रपणे किंवा अजित पवार गटासोबत एकत्र येणार नाही. शशिकांत शिंदे यांच्याशीही पवारांनी चर्चा केलेली असून सुप्रिया सुळे, शरद पवार आणि शशिकांत शिंदे या तिघांनी मिळून महाविकास आघाडीच्या नावाने निवडणूक लढवण्याचा निर्णय निश्चित केल्याचे जगताप यांनी सांगितले.

Indu Mill Smarak : डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदू मिल स्मारकाचे लोकार्पण पुढच्या वर्षी !

काही दिवसांपूर्वी प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर आपण पदाचा राजीनामा देऊन राजकारणातून बाहेर पडू, असे स्पष्ट वक्तव्य केले होते. त्यामुळे पक्षातील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज झालेल्या चर्चेनंतर त्यांच्या भूमिकेला पुष्टी मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याची शक्यता संपुष्टात आल्याचे चित्र आहे. जगताप यांनी सांगितले की शरद पवारांचा किंवा पक्षाचा वेगळा विचार नाही आणि मतैक्यानेच महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जायचे आहे. हा निर्णय अधिकृतपणे शशिकांत शिंदे जाहीर करतील.

Passengers anger : इंडिगो एअरलाईन्सचे प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमुळे राजकीय हालचालींना वेग आला असून विविध ठिकाणी नवी समीकरणे तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीतदेखील दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात असताना आता शरद पवारांकडून झालेल्या स्पष्ट भूमिकेमुळे निवडणुकीची रणनीती ठाम झाली आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढत राहण्याच्या निर्णयामुळे निवडणूकपूर्व राजकीय घडामोडींना नवीन दिशा मिळाली असून आगामी काळात पुणे महापालिकेतील राजकीय लढत आणखी रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

____