Breaking

Maharashtra politics : विधानसभेपूर्वी 160 जागांची गॅरंटीची ऑफर; आम्ही नाकारली !

Sharad Pawar’s revelation in Nagpur : शरद पवारांचा नागपूरमध्ये गौप्यस्फोट

Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना एक धक्कादायक खुलासा केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीमध्ये दोन व्यक्तींनी त्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील 288 पैकी तब्बल 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिल्याचे पवारांनी सांगितले. मात्र, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर पूर्ण विश्वास असल्याने आम्ही त्याकडे दुर्लक्ष करून थेट जनतेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पवार म्हणाले, “मला आठवतंय, विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दिल्लीमध्ये दोन लोक भेटायला आले. त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 160 जागा जिंकवून देऊ शकतो. मला आश्चर्य वाटलं, पण निवडणूक आयोग या संस्थेबाबत मला अजिबात शंका नव्हती, त्यामुळे मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. नंतर या लोकांची भेट राहुल गांधींशी घालून दिली, पण शेवटी आम्ही ठरवलं की या मार्गाने जाणार नाही. आम्ही जनतेत जाऊ, आणि जो कौल मिळेल तो स्वीकारू.”

Bhumares land dispute ; खासदार भुमरेंच्या ड्रायव्हरला ‘ गिफ्ट ‘ मिळालेल्या जमिनीची किंमत 241 कोटी !

या खुलाशाला आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही दुजोरा दिला. आव्हाड म्हणाले की, “ते दोन लोक मतदार यादीत फेरफार करून 160 जागांवर विजय मिळवून देण्याची ऑफर घेऊन आले होते. मात्र पवार साहेबांनी ती थेट नाकारली.”

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा शब्द झाला पूर्ण, रक्षा बंधनाच्या पूर्वसंध्येला धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात !

दरम्यान, भाजप नेते प्रविण दरेकर यांनी पवारांच्या या दाव्याला “बालिश आणि हास्यास्पद” असे म्हटले. ते म्हणाले, “तुमच्याकडे असे लोक आले, आणि तुम्ही त्यांना राहुल गांधींकडे घेऊन गेलात, म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टींना समर्थन द्यायचा विचार होता का? आता ‘बैल गेला आणि झोपा केला’ अशी स्थिती आहे. हतबलतेतून असे दावे पुढे येत आहेत.” या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर चर्चा रंगू लागली आहे.

_____