Maharashtra Politics : समज देऊन सोडा, मंत्र्यांना सवलत, जनतेला शिक्षा !

Uddhav Thackeray groups attack on government policy : सरकारच्या धोरणावरून उद्धव ठाकरे गटाचा हल्लाबोल

Mumbai : राज्यात सध्या गाजत असलेल्या ‘ समज देऊन सोडा’ या वादग्रस्त धोरणावर शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनाने जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीकास्त्र सोडताना, या धोरणाला थेट ‘ फडणवीस ॲक्ट 2025’ अशी उपाधी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळातील गंभीर आरोपांतील मंत्र्यांना कोणतीही कारवाई न करता समज देऊन मुक्त केल्याच्या निर्णयावरून सरकारवर पक्षपाती न्यायपद्धती राबवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

लेखात म्हटले आहे की, सामान्य नागरिक किरकोळ गुन्ह्यांमुळे तुरुंगात जाऊ शकतो, पण मंत्र्यांना मात्र समज देऊन सोडले जाते. हे धोरण न्यायव्यवस्थेची थट्टा करणारे आहे आणि लोकशाहीतील समतेच्या तत्त्वाला धोका निर्माण करणारे आहे, असे मत मांडले गेले. विशेष म्हणजे हे आरोप काही साध्या बाबतीतले नाहीत, तर मंत्र्यांवर भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार, रेव्ह पार्टी, हनी ट्रॅप यांसारख्या गंभीर प्रकरणांतील आहेत.

Mahavitaran : विदर्भात १००७ वीजवाहिन्यांचे विलगीकरण, ७२७ उपकेंद्रांचे सक्षमीकरण अंतिम टप्प्यात

 

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, सामाजिक न्यायमंत्री शिरसाट, मंत्री संजय राठोड आणि मंत्री योगेश कदम यांचे नाव घेत त्यांच्यावर आरोप केले आणि त्यांनी पदावर राहणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत फटकारले, समज दिली आणि नंतर त्यांना माफ केले, ही माहितीही पुढे आली आहे. यावर टीका करताना विचारले आहे की, हा नियम पोलिस, न्यायालये, सर्वसामान्य नागरिक यांच्यावरही लागू होणार का?
याशिवाय पुण्यातील खराडी भागात झालेल्या खासगी पार्टीला ‘रेव्ह पार्टी’ म्हणून घोषित करून अटक करण्यात आली होती. त्यात एकनाथ खडसे यांचे जावईही होते. त्यांच्या बाबतीत ‘समज देऊन सोडण्याचा’ नियम का लावला गेला नाही, हा सवाल उपस्थित केला आहे. सरकारमधील काही मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले असून, त्यांनाही माफ करण्यात आले आहे. त्यामुळे हा कायदा केवळ मंत्र्यांसाठी राखीव असल्याचा आरोप केला आहे.

Student participation : नागपूरच्या विधान भवनात भरली ‘संसद युथ पार्लमेंट’

‘लाडकी बहीण’ योजनेत 4800 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत म्हणले आहे की, या योजनेचा लाभ महिलांऐवजी अनेक पुरुषांनी घेतला असून, त्यांनी बनावटपणे पैसे उकळले आहेत. मात्र, हे घोटाळेबाजही मुख्यमंत्र्यांकडून समज घेऊन मोकळे होणार अशी टीका करण्यात आली आहे. ‘ फडणवीस ॲक्ट 2025’ मुळे भाजपमध्ये अनेक आर्थिक गुन्ह्यांतील आरोपी सामील झाले आहेत. उद्या नीरव मोदी, छोटा शकील, दाऊद इब्राहीम, अबू सालेम हेही या कायद्याच्या आधारावर भाजपमध्ये सामील होतील का, असा सवाल उपस्थित केला आहे.

Akola Congress : अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये खळबळ; मोठ्या नेत्याचा राजीनामा

याशिवाय या लोकांना माफ करा, ते निवडणुका जिंकवून देतील अशी याचिका भाजपचे नेते अ‍ॅड. उज्ज्वल निकम दाखल करतील अशी व्यंगात्मक टिप्पणीही केली आहे.
एकंदरीत, राज्यातील मंत्र्यांना केलेली सवलत, सामान्य जनतेसाठी कठोर कारवाई, तसेच एकाच कायद्याचे वेगवेगळे उपयोग यावरून विरोधकांनी सरकारवर दुहेरी न्याय आणि राजकीय संरक्षणाचा आरोप करत हल्ला चढवला आहे. ही टीका राज्यातील सत्ताधाऱ्यांसाठी गंभीर राजकीय दबाव निर्माण करणारी ठरू शकते.

______