Maharashtra politics : पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची शक्यता !

Will action be taken against bagwala ministers Rohit Pawars question : ‘बॅगवाल्या मंत्र्यां’ वर कारवाई होणार का? रोहित पवारांचा सवाल

Mumbai : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा चर्चेत आले आहेत. विधीमंडळाचे कामकाज सुरू असताना कोकाटे हे मोबाईलवर ‘रमी’ हा पत्त्यांचा खेळ खेळताना दिसल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकारामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, माझी कृषीमंत्र्यांशी लवकरच भेट होईल. त्यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री व मी मिळून निर्णय घेऊ. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कोकाटे यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा होण्याची शक्यता आहे, हीच कठोरता इतर मंत्र्यांसाठीही सरकार दाखवेल का? बॅगवाल्या मंत्र्यांवर कारवाई करण्याची हिंमत शिंदे साहेब दाखवणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Preamble of Constitution : संविधान प्रस्तावनेत ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ कायमच राहणार !

दरम्यान, माणिकराव कोकाटे हे सध्या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, ज्या हॉटेलमध्ये ते थांबले आहेत त्या ठिकाणी विरोधकांनी सकाळपासून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन छेडले आहे. दुसरीकडे, कोकाटे यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येने हॉटेलसमोर जमले असून, त्यांच्याही कडून समर्थनार्थ घोषणाबाजी केली जात आहे. त्यामुळे हॉटेल परिसर पोलीस छावणीसारखा दिसत आहे. कोकाटे यांचे समर्थक म्हणतात की, विरोधक केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी हा प्रकार करत आहेत. कोकाटे साहेब निष्पाप असून, हे सर्व एक स्टंट आहे.