Sanjay Rauts criticism for releasing ministers : मंत्र्यांना समज देऊन सोडल्याबद्दल संजय राऊत यांची टीका
Mumbai : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी आरोप केला की महाराष्ट्रात आता नवीन कायदा लागू झाला आहे, ज्याचे नाव ‘फडणवीस ॲक्ट’ आहे. या कायद्याअंतर्गत काही मंत्र्यांना समज दिली जाते आणि त्यानंतर त्यांना सोडून दिलं जातं. उर्वरित सर्वसामान्यांवर मात्र कायदेशीर कारवाई होते, त्यांना अटक केली जाते. मंत्रिमंडळातील जे नेते खरोखर तुरुंगात असायला हवेत, ते आज मंत्री आहेत. माणिक कोकाटे, संजय राठोड, शिरसाट यांच्यावर आरोप असूनही कारवाई होत नाही, कारण फडणवीस ॲक्टमुळे ते वाचवले जात आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी कृष्णा आंधळे हा मुख्य साक्षीदार आहे. तो अचानक गायब झाला आहे. संजय राऊत म्हणाले की अनेक वर्षांपूर्वी सामना चित्रपटात विचारलं गेलं होतं, ‘ मारुती कांबळेचं काय झालं?’ आज महाराष्ट्रात विचारलं जातंय, ‘ कृष्णा आंधळेचं काय झालं?’ त्याला कुठे गायब केलं, हे सरकारने सांगावं.
ED raid ; मंत्र्यांना मोठा धक्का ! नातेवाईकावर ईडीची मोठी कारवाई,
राऊत यांनी दादा भुसे यांचे नातेवाईक आणि वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांच्या संदर्भात देखील आरोप केले. त्यांनी म्हटलं की अनिल पवार यांची नेमणूक ही दादा भुसे यांच्या आग्रहावरून झाली आणि एकनाथ शिंदे यांनी ती पूर्ण केली. आता जेव्हा त्या आयुक्तांवर ईडीची धाड पडते, तेव्हा यामागील धागेदोरे थेट त्या मंत्र्यांपर्यंत जातात, असं त्यांनी सुचवलं.
राऊत म्हणाले की शिंदे गटाच्या नेत्यांवर अलीकडे कारवाई सुरू झाल्याचं दिसतं. अमित साळुंखे यांच्यावर कारवाई झाली, झारखंड दारू घोटाळा उघड झाला. त्यामुळे आता शिंदे गटाला इशारा दिला जातोय की हालचाल केली तर टेबलावरच्या फायली पोलिसांकडे जातील. वसई-विरार आयुक्तांच्या नेमणुकीबाबतची माहितीही बाहेर येत आहे.
माणिकराव कोकाटे सुमारे 22 मिनिटे रमी खेळत होते, असा अहवाल आहे. अर्जुन खोतकर यांच्या पीएकडे दीड कोटीहून अधिक रक्कम सापडली. धुळ्याच्या ठेकेदाराने 10 कोटी रुपये जालन्याला पाठवले. तरीही यावर कोणतीही चौकशी होत नाही. फडणवीस केवळ घोषणा करतात. कारवाई मात्र होत नाही. अंदाज समितीचा अध्यक्ष लाचखोर असतानाही त्याला वाचवलं जातं, कारण हेच फडणवीस ॲक्ट आहे. सरकार भ्रष्ट मंत्र्यांना वाचवत आहे, म्हणून मंत्र्यांचा राजीनामा होण्याची अपेक्षा ठेवता येत नाही. विरोधी पक्षाने राज्यपालांची भेट घेतली असून लवकरच राष्ट्रपतींचीही भेट घेणार असल्याचं राऊतांनी सांगितलं.
Ladki Bahin Yojna: ‘ लाडकी बहीण’ योजनेतील सर्व लाभ परत घेण्याची मागणी !
नरेंद्र मोदी यांच्या कालच्या भाषणावर टीका करताना राऊत म्हणाले की ते भाषण रुदाली रडगाण्यासारखं होतं. विरोधी पक्षाने विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला गृहमंत्री, संरक्षण मंत्री किंवा पंतप्रधानांनी उत्तर दिलं नाही. मोदी म्हणाले की माझ्यावर कोणताही दबाव नव्हता, कोणाशी चर्चा झाली नाही. पण ट्रम्प यांनी लगेच सांगितलं की त्यांनी युद्ध थांबवलं. पाकिस्तानला चीनने मदत केली, त्यांचं नाव मोदींनी घेतलं नाही. हे सरकार चीन आणि ट्रम्प यांचं नाव घेण्यास घाबरतं. त्यामुळे हे सरकार हातभर फाटलेलं आहे. अशी ठिकाणी राहू त्यांनी केली.








