Maharashtra Politics : ‘ हो सरकार मी पाडलं, पण त्यांनीच मला मुख्यमंत्री केल’

Sharad Pawar revealed a historical incident for first time : शरद पवारांनी प्रथमच ऐतिहासिक प्रसंग उलगडला

Pune : पुण्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी आपल्या राजकीय प्रवासातील एक ऐतिहासिक प्रसंग उलगडला. “वसंतदादांचे सरकार मीच पाडले, पण त्यानंतर त्याच वसंतदादांनी मोठ्या अंत:करणाने मला मुख्यमंत्रि पदासाठी पाठिंबा दिला,” अशी थेट कबुली पवारांनी यावेळी दिली.

पवार म्हणाले, 1978 साली आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी प्रेरित होतो. वसंतदादा इंदिरा काँग्रेसमध्ये होते. निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेस एकत्र आले आणि वसंतदादा मुख्यमंत्री झाले. पण आम्हा तरुणांचा त्याला विरोध होता. त्यामुळेच आम्ही ठरवून दादांचे सरकार पाडले आणि मी मुख्यमंत्री झालो.

Adivasi Pardhi Development Council : आदिवासी पारधी कुटुंबांना मिळणार हक्काचे घरकुल !

याच आठवणींना उजाळा देताना पवार म्हणाले, पुढे दहा वर्षांनी आम्ही पुन्हा एकत्र आलो. मुख्यमंत्री कुणाला करायचं यावर चर्चा सुरू होती. अनेक नावे पुढे आली. पण त्यावेळी वसंतदादांनी मोठ्या मनाने सांगितलं आता इतर कुणाच्या नावाची चर्चा नको, पक्ष उभा करायचा असेल तर नेतृत्व शरदकडे द्या. म्हणजेच ज्यांचा मी पराभव केला, त्या व्यक्तीनेच भूतकाळ विसरून मला नंतर खंबीर साथ दिली. त्या काळचं राजकारण मोठ्या अंत:करणाने आणि तत्त्वासाठी केलं जात होतं.

राजकारणातील या प्रसंगाचा संदर्भ देत पवारांनी आजच्या परिस्थितीवर टीका केली. ते म्हणाले, “पूर्वी राजकारणात मोठेपण होतं, आता मात्र राज्यकर्त्यांकडूनच संसदेचं कामकाज बंद पाडलं जातं. 14 दिवसांच्या अधिवेशनात सातत्याने गोंधळ घालून काम ठप्प केलं जातं. संसदीय लोकशाहीला न शोभणारं हे चित्र बदलायचं आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवाहरलाल नेहरूंचा उल्लेख न केल्याबद्दल पवारांनी नाराजी व्यक्त केली. जगभरात भारताचा लौकिक वाढवणारे आणि देश एकसंध ठेवणाऱ्या नेहरूंना विसरणं योग्य नाही. गांधी – नेहरूंच्या विचारांनीच देशाला नवा चेहरा देता येईल आणि त्यासाठी आम्ही पुन्हा एकत्र येऊ, असे पवार म्हणाले.

Three new police stations : नागपूर जिल्ह्यात तीन नवे पोलिस स्टेशन्स होणार !

त्यांनी वसंतदादांसह त्या काळातील नेत्यांच्या नेतृत्वगुणांचीही आठवण करून दिली. वसंतरावांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. त्यांनी महाराष्ट्राला ताकदवान नेतृत्वाची फळी दिली. त्यामुळेच महाराष्ट्राने देशात उत्तम राज्य म्हणून लौकिक कमावला, असे गौरवोद्गार पवारांनी काढले.

शरद पवारांच्या या भाषणाने महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक वळणं आणि नेतृत्वाच्या मोठ्या मनाचा वारसा लोकांसमोर आला.