Maharashtra Politics : नाराजी नाट्य; मिंधे – गोगावले दौऱ्यावर

Thackeray group attacks the ruling party : ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

Mumbai: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नाराजीचे वारे जोरदार वाहत असून सत्ताधारी पक्षांमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. ठाकरे गटाने आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून सरकारवर हल्लाबोल करत राज्यातील जनतेसाठी कोणतीही ठोस कामे होत नसल्याचा आरोप केला आहे. यात म्हटले आहे की, सत्ताधाऱ्यांचे सर्व लक्ष फक्त स्वहित जपण्यात आणि एकमेकांवर कुरघोड्या करण्यातच अडकले आहे. त्यामुळे हे सरकार प्रत्यक्षात जनतेचे नसून “नाराजांचे सरकार” आहे.

मंत्रिमंडळ बैठकीला मंगळवारी उपमुख्यमंत्री मिंधे गैरहजर राहिले. ते थेट श्रीनगरला रवाना झाले आणि तेथे एका मल्लासोबत रक्तदानाचा कार्यक्रमही त्यांनी मोठ्या थाटात केला. यावर उपरोध करत, मिंधे हे सरकारमधील अंतर्गत नाराजीचे स्वयंघोषित ‘ब्रँड’ असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस त्यांना असे धक्के देतात की त्यांचे मन मंत्रालयात रमत नाही, असा चिमटा काढण्यात आला आहे. गेल्या आठवड्यातही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन नाराजीचा पाढा वाचला होता, असेही नमूद केले आहे.

Rice smuggling : सरकारी तांदळाची आफ्रिकेत तस्करी !

फक्त मिंधेच नव्हे, तर त्यांचे सहकारी मंत्री भरत गोगावले यांनी त्यांच्या देखील मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली. त्यांनी दिल्ली गाठून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेत राज्यातील भाजप नेतृत्वाविरोधात तक्रारी मांडल्या. रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून गोगावल्यांचे रडगाणे अजूनही सुरूच असल्याचेही ठळकपणे सांगितले गेले आहे.दरम्यान, भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निधीवाटपाच्या विषयावरून टीका केली. आमदार निधी आणि खात्यांना दिला जाणारा निधी यावरून मिंधे गटाचे मंत्री आणि अजित पवार यांच्यातील वाद कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. याआधीही मिंधे यांच्या आदेशाला मुख्यमंत्री फडणवीसांनी नकार दिला होता, तसेच ‘बेस्ट’ उपक्रमाच्या पदांवरून नगरविकास आणि सामान्य प्रशासन विभागांमध्ये एकाच दिवशी वेगवेगळे आदेश निघाल्याने तणाव उघड झाला होता.

Uday Samant : महायुतीचे सरकार येण्याचे श्रेय एकनाथ शिंदेंना

या सर्व घडामोडींवरून ठाकरे गटाने सरकारवर जोरदार टीका करताना म्हटले आहे की, राज्यात जनहिताची कामे ठप्प आहेत. सत्ताधाऱ्यांचे सर्व लक्ष केवळ एकमेकांची उणीदुणी काढण्यात, पाय खेचण्यात आणि नाराजीची नाटके रंगवण्यात व्यस्त आहे. कुणी नाराजीच्या ‘छटा’ दाखवतो आहे तर कुणी नाराजीच्या ‘जटा’ आपटत आहे, अशा उपरोधिक भाषेत सरकारमधील अंतर्गत संघर्षाचे वर्णन करण्यात आले आहे. जनतेच्या अपेक्षा बाजूला ठेवून सत्तासंघर्षात रंगलेल्या या घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.