Breaking

Maharashtra poltics : पडद्याआड घडामोडी, ‘गोंधळात-गोंधळ’ की ‘गुडघ्याला बाशिंग’

After Fadnavis raj Thackeray meet, MNS leaders meet Minister : फडणवीस-ठाकरे भेटीनंतर मनसे नेते मंत्री उदय सामंतांच्या भेटीला

Mumbai : मनसे नेते राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच सविस्तर भेट झाली, आणि महाराष्ट्राचा राजकारणात एकच चर्चा सुरू झाली. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याचा चर्चेत मुख्यमंत्र्यांनी टाइमिंग साधत राज ठाकरेशी चर्चा केली. यातच आता मनसे नेते मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पडद्याआड घडत असलेल्या घडामोडीत ‘गोंधळात गोंधळ’ सुरू आहे की, ‘गुडघ्याला बाशिंग’ बांधण्याचा प्रकार चालू आहे. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

राज्याच्या राजकारणात उद्धव आणि राज ठाकरे यांची बरीच चर्चा होऊनही भेट काही झाली नाही. उद्धव सेनेने युतीची साद दिली पण मनसेने नेमकं कुणाला टाळी दिली याबद्दल तर्क लढविले जात आहेत. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत गुप्तगू केली. या भेटीचा तपशील समोर आलेला नाही. मात्र राज्याच्या राजकारणात हा विषय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगला चर्चेत राहिला. पडद्याआड काय घडामोडी घडत आहेत याबद्दल उत्सुकता ताणली गेली.

Raj Thackeray Meets Devendra Fadnavis : राज-फडणवीसांच्या भेटीने ‘मनोमिलन’ धोक्यात!

दोन महिन्यांपासून राज्यात दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येण्याची चर्चा होती. उद्धव ठाकरे यांनी ‘महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल’ असे म्हणले होते. आता संदेश नाही थेट बातमीच देऊ असे ही ते म्हणाले. पण मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे मनसैनिक आणि शिवसैनिकही गोंधळले. फडणवीस यांनी मुत्सद्देगिरीने दोन ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा करणाऱ्यांना आणि मातोश्रीला थेट संदेश दिला.

राज-देवेंद्र अध्याय संपत नाही तोच मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे मंत्री उदय सामंतांच्या भेटीला पोहचले. त्यामुळे महायुतीत आता मनसे पण दिसेल का? असा प्रश्न निर्माण झाला. पण या भेटीमागील कारणं दोघांनीही स्पष्ट केले. देशपांडे-खोपकर आणि सामंत यांच्या भेटीने त्यात अजून भर पडली.

Raj Thackeray meets Devendra Fadnavis : ‘त्यांचा इगो मोठा नाही, पण त्यांनी मौन साधलेय,’ नाव खराब होऊ शकतं!

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट का घेतली याची मला कल्पना नाही. मी एक प्रस्ताव घेऊन सामंत यांच्या भेटीला आलो होतो. पनवेलमध्ये फुलबाजार सुरू करायचा आहे. त्यासंदर्भात आपण त्यांची भेट घेतली. यावेळी युतीची चर्चा वगैरे काही झाली नाही. युतीची चर्चा ही वरिष्ठ पातळीवर होते. कार्यकर्ते युतीची चर्चा करत नाहीत, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.

Raj Thackeray-Devendra Fadnavis : भावांच्या मनोमिलनाच्या चर्चेत राज ठाकरे, फडणवीस यांचे ‘मिलन’

 

तर मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा या भेटीवर मत व्यक्त केले. नवी मुंबईतील एका विकास कामासंदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे हे मला आणि श्रीकांत शिंदे यांना भेटले. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आणि आमच्यातील दोन्ही भेटी आज झाल्या, हा फक्त योगायोग आहे. उद्धव ठाकरे गटाने राज ठाकरे यांना अटी आणि शर्ती घातल्या त्याचवेळी मी म्हटले होते की, राज ठाकरे हे स्वाभिमानी आणि स्वतंत्र नेते आहेत. फडणवीस यांची भेट घेऊन राज ठाकरे यांनी त्याचा प्रत्यय दिला आहे, असे सामंत म्हणाले.