Confiscation action on the plot of the state government itself : महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळावर नामुष्की
Nagpur सरकारी कार्यालयांकडून एरवी विविध कर थकविला जात नाही व असे झाले तरी त्यांच्यावर फारशी कारवाई होताना दिसत नाही. मात्र महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळावर अनोखी नामुष्की ओढविली आहे. मालमत्ता कर थकविल्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या पथकाने महामंडळाच्या भूखंडावरच जप्तीची कारवाई केली आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
यासाठी जबाबदार असलेल्या महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी समोर येत आहे. अनेकांनी मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी बुधवारी बैठक घेऊन मालमत्ताधारकांवर स्थावर व जंगम मालमत्ता जप्तीची कारवाई करावी. असे निर्देश दिले होते. उमरेड रोडवर महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे कार्यालय आहे. येथे रेशीम संचालनालयाचे जिल्हा रेशीम कार्यालयदेखील आहे.
Divisional Commissioner of Nagpur : वाळूघाटासह गौणखनिज उत्खननावर आता ड्रोनद्वारे वॉच
महामंडळाने महापालिकेचा १९ लाख ८२ हजार रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. त्यामुळे थकबाकीदाराच्या वसुलीसाठी महापालिकेच्या नेहरूनगर झोनने महामंडळाच्या भूखंडावर जप्तीची कारवाई केली. नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त विकास रायबोले यांच्या नेतृत्वात कर अधीक्षक संजय कापगते, सचिन मेश्राम, संदीप पतंगे, दीपक स्वामी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पथकाने उमरेड रोडवरील नागपूर गालीचा प्रकल्पाच्या भूखंडावर जप्तीची कारवाई केली. त्यांच्यावर १८ लाख ३ हजार रुपये मालमत्ता कराचे थकीत आहे. सहायक आयुक्तांनी प्रसिद्धी माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार नेहरूनगर झोनला मालमत्ता कराचे ३१ कोटी वसुलीचे लक्ष आहे. त्याअनुषंगाने झोनअंतर्गत असलेल्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यात आली. विहित मुदतीत थकबाकीदारांनी कराचा भरणा न केल्यास २ टक्के शास्ती व जप्त केलेल्या भूखंडाचा लिलाव करण्यात येणार आहे.