MahaSahakar : गोंदियामध्ये Income Tax भरणारे देखील मजूरच!

Income tax payers in Gondia are also laborers : संस्थेच्या नावात मजूर मात्र, प्रत्यक्षात वेगळेच चित्र

Gondia जिल्ह्यात एकूण १५७ मजूर सहकारी संस्था आहेत. यापैकी ७१ मजूर संस्थांचा ‘मजूर सहकारी संस्थेत’ सहभाग आहे. या संस्थांचे नाव जरी मजूर सहकारी संस्था असे असले. तरीही यात आयकर Income Tax भरणारे सुद्धा मजूर म्हणून लाभ घेत आहेत. त्यामुळे खरे मजूर किती असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सर्वसामान्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सहकार विभागाच्या माध्यमातून केले जात आहे. पण आयकर भरणारे सुद्धा या मजूर संस्थांचा लाभ घेत असल्याचे, सामाजिक कार्यकर्ते रोशन बडोले यांना माहिती अधिकारात कळले आहे. मजुरांनी संघटित होऊन कामाच्या माध्यमातून प्रगती करावी, या दृष्टिकोनातून मजूर सहकारी संस्थांची नोंदणी करण्यात आली. या संस्थांना अकुशल कामे वाटप करण्यात आली. परंतु मजूर नावाचा उपयोग काही धनाढ्य व्यक्ती करीत असल्याचे पुढे आले आहे.

NDA Government : शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे ‘पोषण’ कसे होणार?

अकुशल कामे तर सोडाच, मजूर संस्था कुशल कामेही अधिकृतरित्या करीत आहेत. अलीकडे एखाद्या गरिबाची थोडीही आर्थिक परिस्थिती सुधारली की त्याला मिळणाऱ्या योजनांपासून वंचित केले जात आहे. तर मग दुसरीकडे व्हीआयपी मजूर किंबहुना आयकर भरणारे मजूर सहकारी संस्थांचा लाभ घेत असताना त्यांच्यावर मात्र कुठलीच कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्यातील मजूर सहकारी संस्थांमध्ये सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यासाठी दीड वर्षापूर्वी शासनाने एक समिती नेमली होती. पण या समितीचे पुढे काय झाले, समितीने चाैकशी करून अहवाल सादर केला का, असे अनेक प्रश्न माहिती अधिकारांतर्गत रोशन बडोले यांनी शासनाकडे उपस्थित केले आहेत.

Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्र्यांनी कॉल केला तरीही निधी मिळाला नाही

जिल्ह्यात मजुरांच्या नावाखाली धनाढ्य व्यक्ती लाभ घेत आहेत; पण त्यांच्यावर अद्यापही कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. जिल्ह्यात १५७ मजूर सहकारी संस्था आहेत. या संस्थांपैकी काही संस्थांचे पदाधिकारी व सदस्य आयकर भरणारे आहेत. त्यामुळे याची सखोल चौकशी करून संबंधिताचे सदस्यत्व त्वरित रद्द करण्याची गरज आहे, असं सामाजिक कार्यकर्ते म्हणत आहेत.