Bapu was coming to Sevagram Ashram on February 1 : ‘आखरी निवास’ ठरले महात्मा गांधींसाठी अखेरचे
Wardha सेवाग्राम आश्रम येथून २५ ऑगस्ट १९४६ ला महात्मा गांधी दिल्लीला गेले. त्यानंतर ते १ फेब्रुवारी १९४८ ला सेवाग्राम आश्रमात येणार होते. पण दिल्लीमध्येच त्यांची ३० जानेवारी १९४८ मध्ये हत्या झाली. या घटनेला ७६ वर्षे झालीत. पण ‘आखरी निवास’ हाच त्यांचा सेवाग्राम आश्रमातील अखेरचा मुक्काम ठरला.
सेवाग्राम येथील महात्मा गांधीजींचा आश्रमाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. आश्रम स्वातंत्र्य चळवळ आणि रचनात्मक कार्याचे महत्त्वाचे केंद्र बनले होते. त्यात वर्धा तालुक्यात अनेक रचनात्मक कार्याची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली होती. आश्रमात देशासाठी कार्यकर्ते घडत होते तर दुसरीकडे रचनात्मक कार्यांना पुढे नेण्यासाठी कार्यकर्ते अथक परिश्रम घेत होते.
Sudhir Mungantiwar : भारताच्या सर्वसमावेशक विकासाचा संकल्प
स्वातंत्र्याएवढेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या कार्याना राष्ट्रहितासाठी योग्य दिशा देण्यासाठी नियोजनबद्ध उपक्रमांची आवश्यकतासुध्दा होती. गांधीजी, देशातील प्रमुख राष्ट्रीय नेते आणि असंख्य कार्यकर्ते यासाठी सतत कार्यरत होते.
देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर अहिंसा, शांती आणि सत्याग्रह याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. यासाठी लोकांमध्ये विश्वास निर्माण करावा लागला. सामान्य लोकांच्या आशा-आकांक्षा राजकारणाशी जोडण्यात आल्या. जीवनाच्या मूलभूत प्रश्नांना आंदोलनाशी जोडले. आंदोलन खेड्यापाड्यांत पोहोचले.
Mahametro Nagpur : मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना हवे केंद्रासारखे वेतन!
सर्व जाती, पंथांच्या,धर्मांच्या लोकांचा सहभाग वाढला होता. विशेष म्हणजे गांधीजींच्या विचार, कार्य आणि तत्वज्ञानाचा प्रभाव सामान्य लोकांवर पडला होता. अहिंसक आणि सत्याग्रह आंदोलनाची धार वाढायला लागली. राजकारण, सामाजिक,आर्थिक,न्याय समता यात सर्वांचा सहभाग वाढल्याने लोकांना गांधी आपलेसे वाटायला लागले होते. गांधीजींचे नेतृत्व लोकांनी मान्य केले होते हे विशेष. नेमक्या ह्याच गोष्ट गांधी विरोधकांना मान्य नव्हत्या.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा जल्लोष असला तरी दुसरीकडे धार्मिक दंगल आणि जाळपोळीच्या घटना वाढल्या. धार्मिक दंगल आणि जाळपोळीच्या घटना थांबविण्यासाठी,सलोखा आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी गांधीजी दिल्ली, नोवाखलीमध्ये गेले. परत ते दिल्लीतील आग विझविण्यासाठी प्राणांची पर्वा न करता प्रयत्न करत होते. ३१ जानेवारीला ते दिल्लीवरून सेवाग्रामसाठी निघणार होते.
आश्रमात २ फेब्रुवारी १९४८ ला रचनात्मक कार्य यावर राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांची बैठक बोलावली होती. पण ३० जानेवारी १९४८ मध्ये त्यांची हत्या करण्यात आल्याने सेवाग्राम येथे येण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. आश्रमातील स्मारकामधील हे निवासस्थान आजही विविध घडामोडींचा साक्षीदार असून महात्म्यांचे सदैव स्मरण करून देते. दिल्लीवरून त्यांच्या अस्थी आणण्यात आल्या होत्या. दि. १२ फेब्रुवारी १९४८ मध्ये पवनार येथील धाम नदीत विसर्जन करण्यात आले.
त्यावेळी काका कालेलकर, एच. इ.मंगलदास पकवासा, रामकृष्ण बजाज यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. आजही तो अस्थी कलश बापू कुटीत सुरक्षित ठेऊन आहे.